महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर
चाकण : चाकण येथे दररोज मुटकेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला, शिक्रापूर रस्त्यावर व एस टी बस स्थानकासह प्रवेशद्वारावर भलामोठा भाजीपाला बाजार भरला जात
आहे. या बाजारामुळे अनेक लहान, मोठे अपघात तसेच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. हा बाजार अपघातास निमंत्रण देत असून येथे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर व चक्क बसस्थानकात भरणाऱ्या या बाजारामुळे बस स्थानकात एसटीला जाण्यासाठी रस्ताच शिल्लक राहत नाही. बांधा वापरा व हस्तांतरण करा ( बीओटी ) तत्वावर बांधलेले एसटी बसस्थानक खरंच प्रवाशांच्या सेवेसाठी आहे का हा प्रश्न पडला आहे. त्यामुळे हे बसस्थानक आहे कि भाजीबाजार ? असा सवाल नागरिकांकडून होत आहे.
चाकण येथे मोठी औद्योगिक वसाहत असल्याने आठवड्यातील सातही दिवस बाजार भरत असतो. कामगारांच्या सुट्टीच्या दिवशी म्हणजेच रविवारी व गुरुवारी आणि शनिवारी व बुधवारी आठवडे बाजार भरतात. हा बाजार अक्षरशः रस्त्याचे कडेला भरत आहे. यामुळे खरेदीला येणारे ग्राहक हे राजरोसपणे रस्त्याच्या कडेला अथवा रस्त्यावर वाहने उभी करत आहेत. तर एस टी बस स्थानकाच्या समोर बसेस आत व बाहेर पडण्याच्या मार्गावरच भाजी विक्रेते भाजी विकायला बसतात त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
बस स्थानकाच्या दरवाज्यासमोरील भाजी बाजार दुसरीकडे हलविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असलेल्या चाकण येथील बस स्थानकासमोर भरणारा धोकादायक बाजार व बसलेले भाजी विक्रेते ( फोटो : प्रसन्नकुमार देवकर )
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.