पुणे विभाग

महाळुंगे इंगळेच्या उपसरपंचपदी नितीन फलके बिनविरोध

महाळुंगे इंगळे : येथील सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक नितीन फलके यांची महाळुंगे इंगळे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली.

महाळुंगे इंगळे येथील उपसरपंच पदाची निवडणूक सरपंच तथा अध्यासी अधिकारी अर्चना मुकुंद महाळुंगकर यांच्या अध्यक्षतेखाली २ एप्रिल रोजी घेण्यात आली. विश्वनाथ महाळुंगकर यांनी त्यांच्या उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी निवडणूक घेण्यात आली. उपसरपंच पदासाठी नितीन तानाजी फलके व किशोर विष्णू भालेराव यांचे नामनिर्देशक पत्र दाखल झाले होते. किशोर भालेराव यांनी नामनिर्देशन पत्र मागे घेतल्याने नितीन फलके यांची बिनविरोध निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी यांनी जाहीर केले. सचिव म्हणून ग्रामविकास अधिकारी बी. बी. गोरे यांनी काम पाहिले. यावेळी शेखर तुपे, विश्वनाथ महाळुंगकर, किशोर भालेराव, ऋषिकेश मिंडे, मयुरी महाळुंगकर, मंगल भोसले, बेबीताई मेंगळे, वैशाली महाळुंगकर आदी उपस्थित होते.

MahaBulletinTeam

Recent Posts

MahaBulletin — 14 Sep 2026

रविवार, १३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 इंद्रायणी…

1 day ago

MahaBulletin — 13 Sep 2026

शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ बँक…

2 days ago

MahaBulletin — 12 Sep 2026

गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे…

3 days ago

MahaBulletin — 10 Sep 2026

सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 जिल्हा…

5 days ago

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

1 week ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

1 week ago

This website uses cookies.