अध्यात्मिक

मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांना पितृशोक, जेष्ठ कीर्तनकार हभप. मणिलाल काका नाईकडे यांचे निधन

मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांना पितृशोक,
जेष्ठ कीर्तनकार हभप. मणिलाल काका नाईकडे यांचे निधन

महाबुलेटीन न्यूज

राजगुरूनगर ( पुणे ) : कडधे ( ता. खेड ) येथील जुन्या पिढीतील जेष्ठ कीर्तनकार, प्रगतशील शेतकरी व पंढरीची पायी वारी करणारे वारकरी हभप. मणिलालकाका उर्फ मोतीराम स्वामी सावळेराम नाईकडे ( वय ९२ वर्षे ) यांचे आज ( दि. ११ मार्च ) रोजी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. भारतीय वनसेवेतील आयएफएस रंगनाथ नाईकडे ( मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक नागपूर वन वृत्त ) यांचे ते वडील होत.

काकांनी जुन्या पिढीत प्रवचन व कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी पहिले किर्तन केले. उभ्या आयुष्यात अखेरच्या श्वासापर्यंत लाखो कीर्तने केली. परंतु संपूर्ण आयुष्यात त्यांनी कोणत्याही कीर्तनाचे मानधन घेतले नाही. ‘विनामूल्य किर्तन सेवा‘ हे व्रत त्यांनी आयुष्यभर पाळले. त्यांनी पुणे जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील अनेक लोक व गावे व्यसनमुक्त केली. ‘काल्याचे कीर्तन‘ हे त्यांचे विशेष होते.

0000

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 19 Oct 2026

रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेडमध्ये…

21 hours ago

MahaBulletin — 18 Oct 2026

गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेड…

2 days ago

MahaBulletin — 13 Oct 2026

सोमवार, १२ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दिल्लीत…

7 days ago

MahaBulletin — 12 Oct 2026

रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेड…

1 week ago

MahaBulletin — 09 Oct 2026

बुधवार, ७ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 दुष्काळी…

2 weeks ago

MahaBulletin — 06 Oct 2026

सोमवार, ५ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

2 weeks ago

This website uses cookies.