चाकण : चाकण औद्योगिक नगरीतील खराबवाडी ( ता. खेड ) येथील मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या अनंतकृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत अत्यंत चुरशीच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत अनंतकृपा पॅनेलने वर्चस्व राखले. पॅनेलचे चार उमेदवार निवडून आले, तर तीन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने पॅनलचे एकूण सात उमेदवार निवडून आले, तर अपक्ष मधून दोन उमेदवार निवडून आले. या निवडणुकीत सभासदांनी चार नवीन चेहऱ्यांना संधी दिली.
हरिश्चंद्र कांबळे यांनी निवडणूक अधिकारी, तर सचिव शिवाजी खराबी यांनी सहाय्यक म्हणून काम पाहिले. या निवडणुकीमुळे सलग तीस वर्षांची बिनविरोध निवडणुकीची परंपरा खंडित झाली. घराघरात गॅस सेवा देणारा सेवाभावी कार्यकर्ता व निवेदक शशिकांत कड या युवकाने सर्व उमेदवारांपेक्षा सर्वाधिक प्रथम क्रमांकाची ७४६ उच्चांकी मते पटकावली.
विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे :-
# सर्वसाधारण उमेदवार :-
१. शशिकांत अर्जुन कड – ७४६,
२. सतीश ज्ञानोबा खराबी – ६४०,
३. सचिन सोपान कड – ५९६,
४. माणिक गुलाब खराबी – ५९६,
५. शंकर नारायण खराबी – ५५५,
६. सोपान तुकाराम खराबी – ५५४
# बिनविरोध निवड झालेले उमेदवार :-
इतर मागासवर्गीय उमेदवार :- भरत सुदाम बिरदवडे
महिला प्रवर्ग :- कल्पना विलास खराबी, कविता गोरक्षनाथ कड.
महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव वत्यांच्या सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त दिला होता. ग्रामस्थ व सभासदांनी भंडाऱ्याची उधळण करीत जल्लोष करून विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.
0000
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…
बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…
शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
This website uses cookies.