In hindsight, Lefty wished he'd picked a faster get-away vehicle!
महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
लातुर : जिल्ह्यातील आटोळा ( ता. चाकुर ) येथील शेतकरी महादेव माणिक गंगापुरे यांनी घरासमोर उभा केलेल्या ट्रॅक्टरची अज्ञात चोरट्याने चोरी केली असून याबाबत चाकुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आटोळा ( ता. चाकुर ) येथील शेतकरी माधव माणिक गंगापुरे यांनी मंगळवारी राञी घरासमोर न्यु हॉलंड कंपनीचा टॅक्टर क्रमांक ( एम. एच. २४ ए. एस. ७८८२ ) उभा केला होता. पहाटे साडेपाचला उठुन पाहीले असता घरासमोर टॅक्टरच नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आम्ही आटोळा गावात व शेत शिवारात पहाणी केली परंतु ट्रॅक्टर कुठेच आढळुन आला नाही. त्यामुळे अज्ञात चोरट्यानी टॅक्टर चोरुन नेले असल्याची तक्रार महादेव गंगापुरे यांनी अखेर चाकुर पोलीसात दिली. आधीच दुष्काळ त्यामध्ये ट्रॅक्टर चोरीस गेल्याने परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.