कोरोना

बार्टीमार्फत आयोजित ऑनलाईन प्रशिक्षणास उमेदवारांचा प्रतिसाद

महाबुलेटिन नेटवर्क।
पुणे:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्गाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत असताना बार्टीने  आपले  प्रशिक्षण वर्ग  बंद ठेवले होते.  एमपीएससी व आयबीपीएसचे सर्व प्रकारचे प्रशिक्षण वर्ग बंद असल्याने महाराष्ट्रातील उमेदवार मोठ्या प्रमाणात मार्गदर्शनापासून वंचित आहेत.  ऑनलाईन पद्धतीने व्यावसायिक प्रशिक्षण वर्गाचे प्रशिक्षण शुल्क भरण्यासाठी उमेदवाराकडे सद्यस्थितीत पैसे नाहीत. प्रशिक्षण कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने राबविण्याकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे व राज्यमंत्री विश्वजित कदम  तसेच सचिव पराग जैन- नानुटीया यांनी केलेल्या  सूचनांनुसार बार्टीचे महासंचालक कैलास कणसे यांनी ऑनलाईन प्रशिक्षणाचे नियोजन केले आहे.
          या प्रशिक्षण वर्गासाठी 90 हजारापेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केले होते. या प्रशिक्षणासाठी उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या प्रशिक्षणाचे थेट प्रक्षेपण युट्युब व फेसबुक वर होत असून याचा दीड लाखांपेक्षा जास्त उमेदवारांना लाभ होत आहे.  महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील असून बार्टीमार्फत देण्यात येणारे हे प्रशिक्षण दर्जेदार असल्याचे प्रतिक्रियांवरुन दिसून येत आहे. या  एमपीएससी प्रशिक्षण यासोबतच या दर्जाचे इतरही प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने बार्टी संस्थेने आयोजित करण्याबाबत विद्यार्थी मागणी करत आहेत.
            महाराष्ट्रातील नामवंत प्रशिक्षक तज्ञ उमेदवारांना मार्गदर्शन करत आहे. सदरचे प्रशिक्षण हे प्रत्येक दिवशी सकाळी 8 ते 12 यावेळेत BARTI Online MPSC या यू ट्यूब चॅनेलवर होत आहे.जे विद्यार्थी प्रशिक्षणापासून वंचित आहेत त्यांनी या चॅनेलवर प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहान बार्टीचे महासंचालक  कैलास कणसे यांनी केले आहे. पुढील काळात पुढील आठवड्यात यूपीएससी व आयबीपीएसचे ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण सुरु होणार आहे. त्याचा देखील उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. या प्रशिक्षणासाठी बार्टीचे निबंधक  गायकवाड, स्पर्धा परीक्षा विभागाचे प्रकल्प संचालक कुणाल शिरसाठे, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रकल्प संचालक  प्रशांत बुद्धिवंत, प्रकल्प अधिकारी दयानंद धायगुडे व नरेश जुड़े हे समन्वयाचे काम पाहत आहेत.
admin

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

3 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

7 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.