कोरोना

पुणे विभागात 79 हजार 312 कोरोनाग्रस्त रुग्ण बरे- सौरभ राव

महाबुलेेेटीन नेटवर्क
पुणे: पुणे विभागातील  79 हजार 312 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. विभागात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 20 हजार 597 झाली आहे.  ॲक्टीव रुग्ण 38 हजार 122  आहे.
             पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी कोरोनाबाबत दिलेल्या माहितीनुसार विभागात कोरोनाबाधीत  3 हजार 163 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 65.77 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.62  टक्के इतके आहे.
 पुणे जिल्हयातील 94  हजार 978 बाधीत रुग्ण  असून कोरोनाबाधित  66 हजार 640 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 26  हजार 153  आहे.  पुणे जिल्ह्यात कोरोना बाधित एकूण 2  हजार 185  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्हयामध्ये बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण 70.16  टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.30  टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 3 हजार 382 संख्येने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 98, सातारा जिल्ह्यात 160, सोलापूर जिल्ह्यात 251 ,  सांगली जिल्ह्यात 188  तर कोल्हापूर जिल्ह्यात 685 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत  4 हजार 549 रुग्ण असून 2 हजार 287  बाधित रुग्ण बरे झाले आहेत.  ॲक्टीव रुग्ण संख्या 2  हजार 121  आहे. कोरोनाबाधित एकूण 141  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 9 हजार 490 कोरोना बाधीत रुग्ण असून 5   हजार  949 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3  हजार 23 आहे. कोरोना बाधित एकूण 518  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 3 हजार 440 रुग्ण असून 987 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.   ॲक्टीव रुग्ण संख्या 2  हजार 351  आहे. कोरोना बाधित एकूण 102  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 8 हजार 140  कोरोना बाधीत रुग्ण असून 3  हजार 449 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4  हजार 474  आहे. कोरोना बाधित एकूण 217  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण  6 लाख 27  हजार 410  नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी  1  लाख  20 हजार 597 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
admin

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

3 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

7 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.