स्पर्धा/परीक्षा

स्पर्धा परीक्षा लेखमाला भाग-२ : “यु” यूपीएससीचा…!

“यु” यूपीएससीचा…!
                 मागील लेखात, आपण करियरच्या वाटा निवडताना घ्यावयाच्या काळजी संदर्भात चर्चा केलेली होती. या लेखात आपण प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी महत्वाच्या असलेल्या “यूपीएससी” ची ओळख करून घेणार आहोत.
                 भारतीय राज्यघटनेच्या “कलम ३१२” अनव्ये स्वायत्तता मिळालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) दरवर्षी विविध पदांसाठी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेच्या माध्यमातून अंतिम यादीत समावेश झालेल्या सनदी सेवकांच्या मार्फत देशाच्या प्रशासनाची बुलंद “चौकट” साकारली जाते. ही चौकट देशाच्या कार्यकारी मंडळाला समांतर राहून विविध भूमिका पार पाडते. संसदेने पारित केलेले कायदे आणि सरकारची ध्येयधोरणे, कार्यक्रम आणि योजना राबवण्याची जबाबदारी सनदी अधिकाऱ्यांवर असते. या साऱ्याच्या अंमलबजावणीसाठी कुशल व कार्यक्षम उमेदवाराची गरज असते. समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत सरकारकडून बनवलेल्या योजना पोहचवण्याचे खडतर कार्य सनदी अधिकाऱ्यांना करावे लागते.
                 तीन टप्प्यात घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेतून विविध पदांसाठी सनदी अधिकारी निवडले जातात. साधारणतः ३ प्रकारच्या नागरी सेवा आहेत. त्या खालील प्रमाणे सांगता येतील.
▪️अखिल भारतीय सेवा
१) INDIAN ADMINISTRATIVE SERVICE
२) INDIAN POLICE  SERVICE
३) INDIAN FOREIGN SERVICE
▪️ गट – अ  सेवा
१) INDIAN P &T ACCOUNTS FIANANCE SERVICE
2) INDIAN AUDIT & ACCOUNTS SERVICE
3) INDIAN REVENUE (IT) SERVICE
४) INDIAN REVENUE (CUSTOMS & CENTRAL EXCISE) SERVICE
५)INDIAN DEFENCE ACCOUNTS SERVICE
६)INDIAN POSTAL SERVICE
७)INDIAN CIVIL ACCOUNTS SERVICE
८)INDIAN RAILWAY TRAFFIC SERVICE
९)INDIAN RAILWAY ACCOUNTS SERVICE
१०)INDIAN RAILWAY PERSONNEL SERVICE
११)INDIAN DEFENCE ESTATES SERVICE
१२)INDIAN INFORMATION SERVICE (JUNIOR GRADE)
१३)INDIAN CORPORATE LAW SERVICE
▪️गट – ब  सेवा
१)ARMED FORCES HEADQUARTERS CIVIL SERVICES
२)DELHI, ANDAMAN & NICOBAR ISLANDS, LAKSHADWEEP, DAMAN DIU & DADRA NAGAR HAWELI CIVIL SERVICE
३)DELHI, ANDAMAN & NICOBAR ISLANDS, LAKSHADWEEP, DAMAN DIU & DADRA NAGAR HAWELI POLICE SERVICE
४)PUDDUCHERRY CIVIL SERVICE
५)PUDDUCHERRY POLICE SERVICE
            या परीक्षेसाठी काही पात्रता पूर्ण करणं उमेदवाराला अनिवार्य असते. परीक्षा देण्यासाठी २१ वर्ष वयाची अट घालण्यात आलेली आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारास वयवर्ष ३२ व ६ संधी , इतर मागासप्रवर्गातील उमेदवारास वयवर्षे ३५ व ९ संधी आणि अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील उमेदवारास वयवर्षे ३७ पर्यंत आयोगाच्या परीक्षा देता येतात. शारीरिकदृष्ट्या विकलांग असलेल्या उमेदवारास वयवर्ष ४२ पूर्ण होईपर्यंत परीक्षा देता येते.
           शैक्षणिक अर्हता पूर्ण करण्यासाठी उमेदवारास पदवी घेणे अनिवार्य आहे. पदवी घेत असताना ही  पूर्व परीक्षा देता येते, परंतु मुख्य परीक्षेसाठी उमेदवारास पदवी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. यूपीएससीचे वेळापत्रक एक वर्ष आधीच घोषित होत असल्याने उमेदवाराला अभ्यासाचे योग्य नियोजन करता येते. पदवी अभ्यासक्रमासोबत या परीक्षांचा अभ्यासक्रम समांतर ठेवून अभ्यासाला तर नक्कीच स्मार्ट वर्क होऊ शकते.
           शीर्षकामधे असलेला “यु” म्हणजे “तू” असून या उमेदवाराचा यशाच्या वाटेतला खरा शिल्पकार आहे. जोपर्यंत उमेदवार स्वतः वेळेचे योग्य नियोजन, अभ्यासक्रमाची योग्य सांगड घालून अभ्यास करत नाही, तोपर्यंत यशाच्या जवळ जाता येत नाही. पुढील लेखात आपण परीक्षेचे स्वरूप समजून घेणार आहोत.
प्रा. मयूर दिलीप जायभाय
MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.