चाकण : खेड तालुक्यातील चाकण जवळील शिंदे गावात असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात चोरट्यांनी डल्ला मारला आहे. अज्ञात चोरट्यांनी रुक्मिणीदेवीच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र चोरुन नेले आहे.
या प्रकरणी मंदिराचे पुजारी आणि ट्रस्टचे अध्यक्ष बबन दशरथ घनवट (वय ५५, रा. शिंदे, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १७ जुलै रोजी सकाळी सात ते रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. खेड तालुक्यातील शिंदे गावात विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आहे. मंदिरात रुक्मिणीदेवीच्या गळ्यात सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र होते. अज्ञात चोरट्याने मंदिराच्या उघड्या दरवाजातून गाभाऱ्यात प्रवेश केला. देवीच्या गळ्यातील हे पंधरा हजार रुपये किमतीचे मणी मंगळसूत्र चोरून नेले. भरदिवसा हा प्रकार घडल्याने शिंदे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केली जात आहे.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.