कोरोना

शाब्बास राजगुरूनगर बँक !

महाबुलेटिन नेटवर्क
चाकण : राजगुरूनगर बँकेच्या शाखेत कोरोना पॉझिटीव्ह झालेले सर्व कर्मचारी घरी परतले आहेत.  १० कर्मचाऱ्यांसह  एक सफाई कर्मचारी यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्याने कोरोनाबाबत बँकेची शाखा हॉटस्पॉट बनल्याच्या बातम्या विविध माध्यमांमधून झळकल्या होत्या. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात या बातमीने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. बँकेचे सर्व कर्मचारी कोरोनावर उपचार घेऊन घरी सुखरूप परतले आहेत.
        जिल्ह्यात अग्रणी असणाऱ्या राजगुरूनगर सहकारी बँकेच्या टिळक चौक येथे सात, पाईट शाखेत तीन,  प्रशासकीय विभागात एक  व एक संचालक कोरोना टेस्टमध्ये पॉझिटीव्ह आढळले होते. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. संबंधीत कर्मचाऱ्यांना उपचार व विलगिकरण हेतूने म्हाळुंगे येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. एक कर्मचारी खाजगी रुग्णालयात होता. सर्व कर्मचारी सुखरूप घरी परतल्याने बँकेच्या दृष्टीने ही समाधानकारक बाब आहे.
        बँकेचे अध्यक्ष गणेश थिगळे यांनी बँक खातेदारांना आवाहन करून काही सूचना ‘महाबुलेटिन’च्या माध्यमातून केल्या होत्या. दरम्यान दोन शाखा काही दिवस बंद ठेवल्या होत्या. सोशल अंतर, अतिगरज असेल तरच बँकेत जाण्याचे आवाहन त्यांनी केले होते. दरम्यान सर्व कर्मचारी व्यवस्थित उपचार घेऊन घरी परतल्याने समाधान व्यक्त होत आहे.
admin

Recent Posts

MahaBulletin — 23 Jul 2026

बुधवार, २२ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 💧 अतिवृष्टी…

3 days ago

MahaBulletin — 20 Jul 2026

रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…

6 days ago

MahaBulletin — 18 Jul 2026

शुक्रवार, १७ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ तीन…

1 week ago

MahaBulletin — 17 Jul 2026

बुधवार, १५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

1 week ago

MahaBulletin — 14 Jul 2026

सोमवार, १३ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 पंढरीच्या…

2 weeks ago

MahaBulletin — 13 Jul 2026

शनिवार, ११ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 मोशी…

2 weeks ago

This website uses cookies.