गुन्हेगारी

शिंदे गावात विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात चोरट्यांनी मारला डल्ला

चाकण : खेड तालुक्यातील चाकण जवळील शिंदे गावात असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात चोरट्यांनी डल्ला मारला आहे. अज्ञात चोरट्यांनी रुक्मिणीदेवीच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र चोरुन नेले आहे.

या प्रकरणी मंदिराचे पुजारी आणि ट्रस्टचे अध्यक्ष बबन दशरथ घनवट (वय ५५, रा. शिंदे, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १७ जुलै रोजी सकाळी सात ते रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. खेड तालुक्यातील शिंदे गावात विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आहे. मंदिरात रुक्मिणीदेवीच्या गळ्यात सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र होते. अज्ञात चोरट्याने मंदिराच्या उघड्या दरवाजातून गाभाऱ्यात प्रवेश केला. देवीच्या गळ्यातील हे पंधरा हजार रुपये किमतीचे मणी मंगळसूत्र चोरून नेले. भरदिवसा हा प्रकार घडल्याने शिंदे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केली जात आहे.

admin

Recent Posts

MahaBulletin — 12 Nov 2026

बुधवार, ११ नोव्हेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेडमध्ये…

13 hours ago

MahaBulletin — 10 Nov 2026

सोमवार, ९ नोव्हेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 मर्सिडीज-बेंझ…

3 days ago

MahaBulletin — 09 Nov 2026

रविवार, ८ नोव्हेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकणमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 08 Nov 2026

शनिवार, ७ नोव्हेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 भीमाशंकर…

5 days ago

MahaBulletin — 07 Nov 2026

गुरुवार, ५ नोव्हेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गौण…

6 days ago

MahaBulletin — 05 Nov 2026

बुधवार, ४ नोव्हेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ विकास…

1 week ago

This website uses cookies.