राजकीय

राजकीय किस्से : शब्दाचा पक्का…

महाबुलेटिन नेटवर्क
नेत्यांचे अनेक किस्से ऐकण्यास मिळतात. एखादे वाक्य मोठी बातमी बनून जाते. एखादा किस्सा राजकीय सुरुंग लावणारा ठरतो. आपापल्या शैलीने असे नेते लक्षात राहतात.
      आक्रमक आणि अतिस्पष्ट बोलणारा हा नेता. कामे पटकन हातावेगळी करणारा म्हणून प्रसिद्ध. त्यांच्यासमोर एखाद्या आमदाराने काही काम घेऊन जायचे म्हणजे आधी चारवेळा विचार करायचा. एखाद्या अधिकाऱ्याने उभे राहायचे म्हणजे पूर्ण माहिती घेऊनच…अन्यथा खैर नाही. काम द्रुतगतीने मार्गी लावावी याच नेत्याने. एव्हाना आपण ओळखले असेलच की कोण आहे हा नेता?
      त्यांच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांचा कॉल येतो. हा कॉल कदाचित सांगितलेल्या कामाची आठवण करून देण्यासाठी असावा. कार्यकर्त्याने नाव सांगताच समोरचा नेता फोनवर बोलता झाला, ”  मला वाटतं अजित पवारला महाराष्ट्रामध्ये लोक शब्दाचा पक्का म्हणून ओळखतात माहीत आहे ना तुला? एकदा मी शब्द दिल्यानंतर परत सांगायची पण गरज नाही…” फोन बंद होतो. कार्यकर्त्याने नाव सांगताच त्याच्या कामाचीही आठवण असणारा असा नेता वेगळाच. हजारो कामातून असे लक्षात ठेवणे अवघडच. हा दादा माणूस मात्र जमवतोय हे सर्व…
      द्रुतगतीने काम करणारा, स्पष्ट बोलणारा, झुलवत न ठेवणारा, प्रसंगी कडू बोलणारा व विरोधकांचीही कामे मार्गी लावणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे असे अनेक ‘दादा’ किस्से महाराष्ट्राला परिचित आहेत. हा दादा शब्दाला पक्का आहे….
admin

Recent Posts

MahaBulletin — 16 Sep 2026

सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गणेशोत्सवाचा…

22 hours ago

MahaBulletin — 14 Sep 2026

रविवार, १३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 इंद्रायणी…

3 days ago

MahaBulletin — 13 Sep 2026

शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ बँक…

4 days ago

MahaBulletin — 12 Sep 2026

गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे…

5 days ago

MahaBulletin — 10 Sep 2026

सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 जिल्हा…

7 days ago

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

1 week ago

This website uses cookies.