जिज्ञासा

दुनिया अनमोल रत्नांची : तेजपुंज पुष्कराज

नमस्कार,
मागचा लेख वाचून एक फोन मला बार्शीवरुन आला होता. त्यांना विचारले तुम्ही कसा वाचला माझा लेख ? त्यांनी जे उत्तर दिले ते ऐकून मी फार अचंबीत झालो.तुमचा लेख तुमच्या एका वाचकाने व्हाँट्सअप केला म्हणे.मग तुमच्या फेसबुकवरील बेल्हेकर ज्वेलर्सच्या पेजवरुन मी तुमचा नंबर मिळवला,आणि निलम देखील तुमच्याच सल्ल्याने घेणार आहे मी. आपल्या ज्ञानाचा इतरांना होणारा फायदा पाहीला की, आनंद वाटतो. असो,
आज आपण पुष्कराज बद्दल चर्चा करणार आहोत.नवरत्नात सर्वात तेजपुंज रत्न जर कोणते असेल तर ते पुष्कराज. पुष्कराज हे एकमेव असे रत्न आहे की, ज्याला सोन्याचा रंग प्राप्त झालाय. पुष्कराज देखील खनिजाच्या संयुगांपासून तयार झालेले रत्न आहे. म्हणजेच पुष्कराज आणि निलम हे दोन्ही एकाच परीवारातील आहेत.भाऊच म्हणा ना एकमेकांचे.फक्त एक निळा आहे तर एक पिवळा. पुष्कराज ला पुष्कर, पुखराज, पितस्फटीक, पीतमणी, याकुन, वल्लभ आणि पिलु देखील म्हणतात.इंग्रजी मध्ये पुष्कराजला Yellow Sapphire असे म्हणतात.
पुष्कराज आँस्ट्रेलिया, मँनमार,भारत आणि श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात सापडतात. सगळ्यात चांगले पुष्कराज सिलाँनचे असतात आणि ते श्रीलंकेत मिळतात. या पुष्कराजची किंमत साधारण पणे १२००० ₹ प्रती कँरेट पासून सुरु होते. हल्ली बाजारात बँकाँक चे पुष्कराज देखिल मिळतात.ते साधारण १०० ₹ प्रमाणे मिळतात परंतु त्याचा उपयोग मात्र होत नाही. पुष्कराजसारखे दिसणारे सिट्रीन आणि यलोटोपाझ देखील पुष्कराज म्हणून घेणारे ग्राहक मी पाहिलेले आहेत.पण यात ग्राहकांचा दोष नाही. विक्रेत्यांनी असं करु नये इतकंच म्हणेन मी.
आयुर्वेदात बुध्दीचा कारक मानले आहे पुष्कराजला.म्हणून मनोवांछित फळ देणारा चिंतामणी मानतात. विद्या, ज्ञान, बुद्धी, मानसन्मान यासाठी पुष्कराज सर्वोत्तम मानला जातो.महत्वकांक्षी, संकटांवर मात करण्यासाठी पुष्कराज आवर्जून वापरावा. व्यावसायिक, प्राध्यापक, वकील, राजकारणी यांनी पुष्कराज वापरावा. मानसिक आजार, ताप,पोटदुखी,दमा, किडणीविकार असणारांनी पुष्कराज वापरावा नक्कीच फायदा होईल. ज्यांना गुरुबळ कमी असते अशांनी पुष्कराज वापरावा.
चांगला पुष्कराज ओळखावा कसा ?  पुष्कराज कधीच त्याचा मुळ रंग सोडत नाही. हल्ली पुप्कराजला ” कलर इनहँन्समेंटची ट्रीटमेंट ”  देऊन त्याचा रंग वाढविण्यात येतो पण अशी रत्ने लगेच कळून येतात. त्यामुळे जो पुष्कराज आपला मुळरंग सोडत नाही तो खरा उत्तम पुष्कराज.ग्राहकांनी पुष्कराजची खरेदी करतेवेळी त्याच्या प्रमाणपत्राची अवश्य मागणी करावी.तेही मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र असावे ( GII किंवा IGI ) पुष्कराज रत्न केवळ सोन्यातच धारण करावे.मूलतः सुवर्णरंग लाभलेला पुष्कराज जेव्हा सोन्याच्या सहवासात येतो तेव्हा तो अधिकच तेजपुंज दिसू लागतो हेच खरे.
गणेश बेल्हेकर
बेल्हेकर ज्वेलर्स
राजगुरुनगर
९६५७३२२१०२
९८२२७९९८९८
admin

Recent Posts

MahaBulletin — 02 Aug 2026

शुक्रवार, ३१ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आज…

13 hours ago

MahaBulletin — 31 Jul 2026

गुरुवार, ३० जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

3 days ago

MahaBulletin — 29 Jul 2026

मंगळवार, २८ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

5 days ago

MahaBulletin — 27 Jul 2026

रविवार, २६ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 नीट…

7 days ago

MahaBulletin — 26 Jul 2026

शनिवार, २५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेडमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 23 Jul 2026

बुधवार, २२ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 💧 अतिवृष्टी…

2 weeks ago

This website uses cookies.