महाबुलेटिन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी
चाकण : उत्तर पुणे जिल्ह्यातील व खेड तालुक्यातील अग्रगण्य, नामांकित असलेल्या राजगुरूनगर सहकारी बँकेच्या एका संचालकासह दहा अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने सेवक वर्ग व सभासदांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सोमवार ( दि. ६ ) खेड तालुक्यात शासकीय लॅब मधून १७ व खासगी लॅब मधून १२ असे एकूण २९ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश गोरे यांनी दिली. विशेष म्हणजे यामध्ये एकाच दिवशी राजगुरूनगर बँकेचे एक संचालक, पाईट शाखेचे दोन व राजगुरूनगर मधील टिळक शाखेचे ८ अशा एकूण ११ जणांना लागण झाली आहे. त्यामुळे अत्यावश्यक काम असेल तरच बँकेत यावे व शक्यतो सर्व व्यवहार ऑनलाईन करावेत असे बँक प्रशासनाने कळविले आहे. बँकेतील सेवकांना कोरोना लागण झाल्याने सभासदांमध्ये घबराट पसरली आहे. यामुळे समूह संक्रमण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या संदर्भात बँकेचे अध्यक्ष गणेश थिगळे म्हणाले कि, ग्राहक व सभासदांनी पैसे काढायला येताना महिन्यातून एकदाच यावे, मोठया रकमेचा रोख भरणा असेल तरच बँकेत यावे. सभासदांनी ऑनलाईन व्यवहार करावेत. पासबुक छपाई, स्टेटमेंट, अशा छोट्या कामांसाठी कोरोनाचे सावट कमी झाल्यावर बँकेत यावे.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.