महाबुलेटीन नेटवर्क / कल्पेश भोई
चाकण : येथील बलुते आळीतील ५० वर्षाच्या व्यक्तीचा सोमवार ( दि. ६ ) सकाळी कोरोनामुळे मृत्यू झाला असून हा चाकण शहरातील पहिला तर परिसरातील तिसरा व खेड तालुक्यातील सहावा बळी ठरला आहे. येथील कोरोनाबधित व्यक्तीला पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, उपचार चालू असताना आज त्यांच्यावर काळाने घाला घातला. तालुक्याच्या ग्रामीण भागात १५४, चाकण शहरात २०, आळंदी शहरात १३ तर राजगुरूनगर शहरात १६ अशी एकूण रुग्णांची संख्या २०३ झाली आहे. खेड तालुक्याच्या ग्रामीण भागात सात, आळंदी नगरपरिषद हद्दीत चार, तर राजगुरूनगर नगरपरिषद हद्दीत एक अशा बारा नवीन रुग्णाची भर पडली आहे. त्यामुळे ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आता १३२ झाली आहे.
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.