महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर : खेड तालुक्यातील कोरोना सदृश परिस्थितीत रुग्ण वाहतुकीसाठी आवश्यक असणारी बाब म्हणजे रुग्णवाहिका…आज ( दि. २ ऑक्टोबर ) रोजी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आमदार स्थानिक विकास निधीतुन चांडोली (राजगुरूनगर), चाकण व आळंदी या तीन ग्रामीण रुग्णालयांची गरज लक्षात घेऊन या तीनही रुग्णालयांना रुग्णवाहिकेचे वाटप केले. तसेच आवश्यक असलेले पीपीई कीट, सॅनिटायझर, थर्मल गन, ऑक्सिमीटर, मास्क, सोडीयम हायपोक्लोराईड इ. मेडिकल साहित्याचे वाटपही यावेळी करण्यात आले. रुग्णवाहिकेच्या उपलब्धतेमुळे अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होणार असल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
या रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी आमदार दिलीप मोहिते पाटील, मा. जि. प. सदस्या सुरेखा मोहिते पाटील, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, विनायक घुमटकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, पुणे जि. प. कृषी व पशुसंवर्धन चे मा.सभापती अरुण चांभारे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष सुभाष होले, राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्षा मनीषा सांडभोर, खेड दक्षता समिती सदस्या ॲड. मनीषा टाकळकर, वरुडेच्या उपसरपंच आशा तांबे व चाकण ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉ. माधव कनकवले, डॉ. दीपक मुंडे व डॉ. जाधव आदी उपस्थित होते.
—
रविवार, २२ मार्च २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 आहिरे…
शनिवार, २१ मार्च २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 गॅस…
शनिवार, २१ मार्च २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुणे-नाशिक…
शुक्रवार, २० मार्च २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 महिला…
गुरुवार, १९ मार्च २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 भीषण…
बुधवार, १८ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे जिल्हा परिषद…
This website uses cookies.