महाबुलेटीन न्यूज : प्रभाकर जाधव
राजगुरूनगर : एम. एच. टी – सी. ई. टी. सन २०२० आणि यू. पी. एस. सी. या परीक्षा देणाऱ्या खेड व आंबेगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांना राजगुरुनगर बस आगारातर्फे एस. टी. महामंडळाची बस उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे राजगुरूनगरचे आगार प्रमुख रमेश हांडे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांची पुरेशी संख्या उपलब्ध झाली; तर योग्य ते तिकीट आकारणी करून त्यांना विविध केंद्रांवर सोडण्याची व्यवस्था देखील करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
राज्यात दि. १ ते २० ऑक्टोबर या कालावधीत महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यामार्फत एम. एच. टी – सी. ई. टी. सामाईक प्रवेश परीक्षा सुरू झाल्या आहेत. त्या २० ऑक्टोबर पर्यंत घेण्यात येणार आहेत.
तसेच यू. पी. एस. सी. च्या परीक्षा दि. ४ ऑक्टोबर रोजी होत आहेत. त्यामुळे परिक्षार्थींना प्रवासाचा त्रास होऊ नये व वेळेत त्या ठिकाणी पोहचता यावे, म्हणून महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. या परीक्षेसाठी जाणाऱ्या खेड व आंबेगाव तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांनी याबाबत अधिक माहितीसाठी राजगुरूनगर बस आगाराशी ०२१३५-२२२०३५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन आगारप्रमुख रमेश हांडे यांनी केले आहे.
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…
बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…
This website uses cookies.