महाबुलेटिन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड : उद्योगनगरीत वाहन चोरीचे गुन्हे करणाऱ्या चार चोरट्यांना गुन्हे शाखा २ व ५ च्या पोलीस पथकाने सापळा लावून अटक केली आहे. त्यांच्याकडून ५ चारचाकी व ९ दुचाकी अशी १४ वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश उर्फ पप्या राजेंद्र सांडभोर ( वय २५, रा. अंकुश आनंद बिल्डिंगच्या मागे, संग्रामनगर झोपडपट्टी, ओटास्किम, निगडी, पुणे ), सुजित उर्फ सुज्या भिवा गायकवाड ( वय २७, रा. घर नं. पी १६, सेक्टर नं. २२, संजयनगर, ओटास्किम, निगडी, पुणे ), अक्षय दशरथ शिंदे ( वय २०, रा, ए पत्राशेड, अजंठानगर, निगडी, पुणे ) व एक विधिसंघर्षित बालक या चार जणांना अटक करण्यात आली आहे.
हि कारवाई पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहा. पो. आयुक्त राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहा. पो. निरीक्षक राम गोमारे, पो. उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार, युनिट २ चे पोलीस हवालदार शिवानंद स्वामी, केराप्पा माने, प्रमोद वेताळ, दीपक खरात, वसंत खोमणे, उषा दळे, विपुल जाधव, चेतन मुंढे, जमीर तांबोळी, जयवंत राऊत, आतिष कुडके, नामदेव राऊत, शिवाजी मुंढे, अजित सानप व युनिट ५ चे पोलीस हवालदार धनराज किरनाळे, दत्तात्रय बनसुडे, संदीप ठाकरे, मयूर वाडकर, गणेश मालुसरे, ज्ञानेश्वर गाडेकर, धनंजय भोसले, शामसुंदर गुट्टे, स्वामीनाथ जाधव, फारूक मुल्ला, सावन राठोड, नितीन बहिरट, भरत माने, राजकुमार ईघारे, दयानंद खेडकर, गोपाळ ब्रह्मांदे व राजेंद्र कदम यांच्या पथकाने केली.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.