खेड

ही तस्करी करतेय कोण?  महसूल अधिकाऱ्यांचे ‘हे वागणं बरे नव्हे’!

महाबुलेटीन नेटवर्क / दत्ता घुले
खेड तालुक्यातील भामा आसखेड धरण लाभक्षेत्रातील आसखेड खुर्द व आसखेड बुद्रूक येथे भामा नदीतून गेल्या कित्येक दिवसांपासून राजरोसपणे वाळू उपसा केला जात आहे. वाळू तस्करीचे खेडच्या महसूल प्रशासनाला  खबर नसावी, हे मात्र शंकास्पद आहे.
             मोठ्या क्षमतेच्या मशीन लावून वाळूच्या उपशामुळे नदीपात्रात मोठे खड्डे पडले आहेत. वाळूचे ढिग करुन ठेवल्याने नुकतेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चालू असलेल्या आसखेड बंधाऱ्याच्या कामाला अडथळा निर्माण झाला असून दोन तीन दिवसांपासून ठेकेदाराने काम बंद केल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
निश्चित एखाद्या बड्या अधिकाऱ्याच्या सहमतीनेच नव्हे, तर भागिदारीतून हा वाळू व्यवसाय चालू असल्याचा दाट संशय व्यक्त केला आहे.
आसखेड खुर्द व आसखेड बुद्रूक ही दोन्ही गावे शेजारी शेजारी असूनही आसखेड खुर्द पाईट मंडल विभागात तर आसखेड बुद्रूक कडूस मंडल विभागात समाविष्ट आहे. त्यामुळे वाळू उपसा व वाळूची अवैध वाहतूक कोणत्या गावाच्या हद्दीतील नदीपात्रातून होते, याची प्रत्यक्ष माहिती घेऊन मंडलाधिकारी संबंधित गावकामगार तलाठ्यामार्फत कार्यवाही केली जाते.  दरम्यान १५ दिवसांपूर्वी एका मंडल विभाकाकडून आसखेडच्या नदीतून होणाऱ्या वाळू चोरीची स्थळपहाणी करुन खेड तहसील कार्यालयाला पंचनामा सादर केला असल्याचे एका महसूल अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली. त्यावेळीही नदीपात्रात वाळूच्या ढिगाशिवाय यंत्रसामुग्री, ट्रक किंवा मजूर आढळून आले नव्हते. परंतु अजुनही तहसील कार्यालयाकडून संबंधितांवर कोणतीही कारवाई झाली नाही व तो अवैध व्यवसाय बंद झाला नाही.
आजही वाळू चोरीच्या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी संबंधित एका मंडलाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता आसखेड खुर्द हद्दीतील स्थळ पहाणी केली, परंतु मशिन, मालवाहतूक गाड्या जागेवर आढळल्या नसून वाळू उपसा करुन वाळू चोरी केली जात असल्याची खात्री झाल्यावर गावकामगार तलाठ्यांना पंचनामा करुन तहसील कार्यालयाला रिपोर्ट करावयास सांगितल्याची माहिती दिली.
आसखेडच्या नदीतून वाळूची चोरीच्या प्रकाराची खेड तहसील कार्यालयाला स्पष्ट माहिती मिळूनही तहसिलदार कार्यालयाकडून कारवाई का केली जात नाही ? या प्रश्नाचे गूढ आहे
admin

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

3 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

7 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.