आळंदी : येथील माईर्स एमआयटीच्या संस्थेच्या वर्कशॉप विभागातील फोरमन बाळकृष्ण तुकाराम कोतुळकर ( वय ८० वर्षे ) यांचे आज ( दि. १० ) सकाळी तळेगाव दाभाडे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,२ मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
बाळकृष्ण कोतुळकर हे गेली ३२ वर्षापासून माईर्स एमआयटीच्या वर्कशॉप विभागात फोरमन म्हणून कार्यरत होते. एमआयटीच्या वर्कशॉप विभागाची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. तत्पूर्वी त्यांनी पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात १९६५ ते १९८८ पर्यंत फोरमन म्हणून काम केले होते.
माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड व अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.
प्रा. डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, माईर्स एमआयटी या शिक्षण संस्थेतील वर्कशॉप विभागाची जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडली. आमच्या संस्थेमध्ये कोतुळकर मास्तर म्हणून विद्यार्थी व कर्मचार्यांमध्ये प्रसिद्ध होते. जगातील सर्वात मोठा घुमट, आळंदी व देहू येथे उभारण्यात आलेला घाट व आळंदी येथील गरूड स्तंभ उभारण्याच्या कार्यात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे. त्यांनी कधीही कुठलीही तक्रार न करता दिलेली सर्व कामे ते व्यवस्थित करत असत. त्यावरून त्यांचा मनाचा मोठेपणा दिसून येतो. त्यांच्या निधनामुळे संस्थेची कधीही न भरून निघणारी मोठी हानी झाली आहे. माईर्स एमआयटी संस्थेच्या वतीने त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.