उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार – डॉ. अमोल कोल्हे, व्हिडीओ कॉन्फरन्स बैठक संपन्न

चाकण : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर उद्योगांचे अर्थचक्र सुरळीत करण्यासाठी चाकण एमआयडीसीतील कंपन्यांना कामगार उपलब्ध करून देण्यासह विविध समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार अशा शब्दांत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज ( एफसीआय ) समवेत आयोजित केलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत कंपनी प्रतिनिधींना आश्वस्त केले.

एका बाजूला लॉकडाऊन शिथिल करून कंपन्या सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली असताना दुसऱ्या बाजूला राज्यातील व परराज्यातील हजारो कामगार त्यांच्या घरी परत गेले. त्यामुळे कंपन्यांना पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. शिवाय सतत बदलणारा कन्टेन्मेंट झोन लक्षात घेता उपलब्ध कामगारांना कामावर येताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, एमआयडीसी व कामगार उपायुक्त कार्यालय आदींकडून योग्य माहिती व मार्गदर्शन कंपन्यांना मिळावे. तसेच त्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांच्या पुढाकाराने आज फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजच्या सदस्य कंपन्यांच्या प्रतिनिधींची व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अविनाश हदगल, पुण्याचे कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ, खेडचे प्रांत अधिकारी संजय तेली, एफसीआयचे दिलीप बटवाल, मोहन पाटील तसेच विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कंपन्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी डॉ. कोल्हे यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल सर्वच कंपनी प्रतिनिधींनी आनंद व्यक्त करताना त्यांच्यासमोर अनेक समस्या मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने बाहेरून येणाऱ्या कामगारांचे १४ दिवस विलगीकरण करण्याची अट, बाहेरगावी गेलेल्या कायमस्वरूपी कामगारांना परत येण्यासाठी पोलीस परवानगी मिळण्यात येणारे अडथळे व पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध न होणे आदींचा समावेश होता. या सर्व प्रश्नांवर कामगार उपायुक्त पोळ, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हदगल तसेच खेडचे प्रांत अधिकारी तेली यांनी समर्पक उत्तरे व माहिती देऊन मार्गदर्शन केले. एफसीआय व प्रशासन यांच्यात माहिती व शासनाचे वेळोवेळी निघणारी परिपत्रके व दररोज बदलणाऱ्या कन्टेन्मेंट झोनची माहिती यांचे आदानप्रदान करण्यासाठी एफसीआयने नोडल अधिकारी नियुक्त करावा असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी एफसीआयला आवश्यक सहकार्य करण्यासाठी आपल्या वेबसाइटवर एक प्लॅटफॉर्म तयार करून स्थानिक परिसरातील व महाराष्ट्रातील विविध भागांतील तरुणांकडून अर्ज मागविले जातील. हे अर्ज एफसीआयच्या माध्यमातून कंपन्यांना पाठवले जातील. त्यातून कंपन्यांनी आपल्याला आवश्यक उमेदवारांची निवड करावी. या माध्यमातून मनुष्यबळाचा प्रश्न सोडवू शकतो या डॉ. कोल्हे यांच्या सूचनेचे सर्वच कंपनी प्रतिनिधींनी स्वागत केले. येत्या दोन-तीन दिवसांत आपल्या वेबसाइटवर यासाठी प्लॅटफॉर्म तयार करून देण्याचा आपला प्रयत्न राहिल असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी उद्योगांचे अर्थचक्र सुरळीत करण्याला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे “पुनश्च हरी ओम” म्हणत आपल्याला अर्थव्यवस्था रुळावर आणण्याला प्राधान्य देण्याचे सुतोवाच केले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. कोल्हे यांनी आयोजित केलेल्या या बैठकीला चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच आपण सातत्याने एकमेकांच्या संपर्कात राहून तुमच्या अडचणी सोडविण्यासाठी एकत्रित प्रयत्न करू असे आवाहन डॉ. कोल्हे यांनी केले.

admin

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.