Categories: कोरोना

“मिशन बिगीन अगेन” बाबत अधिसूचना जाहीर – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे, दि. 1 : कोविड – 19 विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत असल्यानेआपत्कालिन उपाय योजनेचा भाग म्हणून राज्यशासनाने संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्याक्षेत्रात लॉकडाऊनची घोषणा यापूर्वी केलेली असून त्यास 30 जून 2020 पर्यंत मुदतवाढआणि टप्पे निहाय लॉकडाऊन समाप्त करणे आणि निर्बंध कमी करण्यासाठी  “मिशन बिगीन अगेन” बाबत अधिसूचना जाहीर केलेली आहे, असे  जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाचे अध्‍यक्ष तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कळविले आहे.  
           आपत्ती  व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी हे या प्राधिकरणाचे पदसिध्दअध्यक्ष आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी  पुणे जिल्हयात आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये पुणे महानगरपालिका क्षेत्र:- पुणे महानगरपालिका हद्दीत आयुक्त, पुणे महानगरपालिका यांचे आदेशातील अटी व शर्तीच्या अधिन राहून महानगरपालिका हद्दीतील सर्व उपक्रम व कृतींना परवानगी राहील. पिंपरी – चिंचवड महानगरपालिका :- पिंपरी -चिंचवड महानगरपालिका हद्दीत आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या आदेशातील  अटी व शर्तींच्या अधिन राहून महानगरपालिका हद्दीतील सर्व उपक्रम व व्यक्तींना परवानगी राहील. पुणे व खडकी छावणी परिषद :-पुणे व खडकी छावणी परिषद क्षेत्र पुणे महानगरपालिका हद्दीजवळ येत असल्याने आयुक्त महानगरपालिका पुणे यांच्या आदेशातील तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे व खडकी छावणी परिषद यांच्या आदेशातील अटी व शर्तींच्या अधिन राहून छावणी परिषद हद्दीतील सर्व उपक्रम व कृतींना परवानगी राहील.देहूरोड छावणी परिषद :-देहूरोड छावणी परिषद  क्षेत्र पिंपरी -चिंचवड महानगरपालिका हद्दीजवळ येत असल्याने आयुक्त महानगरपालिका पिंपरी-चिंचवड यांच्या आदेशातील व मुख्य कार्यकारी अधिकारी, देहूरोड छावणी परिषद यांचे आदेशातील अटी व शर्तींच्या अधिन राहून छावणी परिषद हद्दीतील सर्व उपक्रम व कृतींना परवानगी राहील. वरीलप्रमाणे क्षेत्र वगळता जिल्हयाचे उर्वरित सर्व क्षेत्र ग्रामपंचायत, नगरपालिका,नगरपरिषद, नगरपंचायत हद्दीत राज्यशासनाकडील अधिसूचनेत परवानगी देण्यात आलेल्या सर्व उपक्रम व कृतींना अधिसूचनेतील अटी व शर्तींच्या अधिन राहून परवानगी राहील.           
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष, तथा जिल्हादंडाधिकारी नवल किशोर राम, यांनी अधिसूचना सुधारणा पुणे जिल्हा कार्यक्षेत्रात लागू केली आहे. हे आदेश दिनांक 30जून 2020 पर्यंत लागू राहतील आणि सर्व संबंधित प्रशासकीय विभाग यांनी या आदेशाची अंमलबजावणी करावी. या आदेशाचा भंग करणा-या कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि संघटनाविरुध्द भारतीय साथ अधिनियम 1897 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंडसंहिता (45 ऑफ 1860) कलम 188 आणि या संदर्भातील शासनाचे प्रचलित इतर अधिनियम व नियम अन्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री. राम यांनी कळविले आहे.

admin

Share
Published by
admin

Recent Posts

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

1 day ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

1 day ago

MahaBulletin — 20 Apr 2026

रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

2 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…

2 days ago

MahaBulletin — 18 Apr 2026

शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…

4 days ago

MahaBulletin — 18 Apr 2026

मंगळवार, १४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…

4 days ago

This website uses cookies.