महाबुलेटीन न्यूज
म्हाळुंगे / चाकण एमआयडी : मोई ( ता.खेड ) येथे गावठी दारू भट्टीवर म्हाळुंगे चौकी पोलिसांनी छापा टाकून सव्वा दहा लाखाचे रसायन नष्ट करून धडाकेबाज कारवाई केली.
म्हाळुंगे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी माहिती दिली की, मौजे मोई, ता.खेड, जि. पुणे येथे सारंग बाबा मंदिराजवळ, ओढ्याच्या बाजूला इसम नामे सुखदेव राठोड रा. मोई याने गावठी हातभट्टी दारू तयार करण्या करिता जमिनी मध्ये खड्डे बनवून त्यामध्ये कच्चे रसायनाचा साठा व दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य बाळगले आहे, अशी खात्रीशीर बातमी गुप्त बातमीदाराकडून मिळाल्याने आम्ही स्वतः दोन पंच व महाळुंगे पोलीस चौकीचा स्टाफ यांच्यासह सदर ठिकाणी जाऊन आज दि. ६ ऑगस्ट, दुपारी २ वाजता छापा टाकून कारवाई केली आहे.
सदर कारवाई मध्ये १० लाख रुपये किमतीचे २० हजार लिटर कच्चे रसायन, १० हजार रुपये किंमतीची लोखंडी टाकी, ४ हजार रुपयांचे काळे रंगाचे कॅड, १० हजार रुपयांचे रसायन असा एकूण १० लाख २४ हजार रुपयाचा माल जेसीबीच्या सहाय्याने जागीच नष्ट केला. सदर गुन्ह्यातील आरोपी सुखदेव राठोड हा पोलिसांच्या येण्याची चाहूल लागताच झाडा झुडपातून पळून गेला असून त्याचा शोध सुरू आहे, मिळून येताच त्याला ताब्यात घेण्यात येत आहे. त्याच्या विरुद्ध मुंबई दारू बंदी कायदा कलम ६५(ख)(च) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
००००
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.