पुणे जिल्हा

महाबुलेटीन ब्रेकिंग न्यूज : खेड बाजार समितीच्या सभापती व सचिवांचे सहीचे अधिकार काढले ● बैल बाजार काँक्रीटीकरण टेंडर प्रोसेसमध्ये भ्रष्टाचार केल्याचा सर्व संचालकांनी केला आरोप ● माजी सभापती चंद्रकांतदादा इंगवले यांना दिले सह्यांचे अधिकार ● भ्रष्टाचाराचे आरोप सभापतींनी फेटाळले आहेत..

महाबुलेटीन ब्रेकिंग न्यूज : खेड बाजार समितीच्या सभापती व सचिवांचे सहीचे अधिकार काढले
● बैल बाजार काँक्रीटीकरण टेंडर प्रोसेसमध्ये भ्रष्टाचार केल्याचा सर्व संचालकांनी केला आरोप
● माजी सभापती चंद्रकांतदादा इंगवले यांना दिले सह्यांचे अधिकार                                         
भ्रष्टाचाराचे आरोप सभापतींनी फेटाळले

महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मासिक मिटिंगमध्ये बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर व प्रभारी सचिव बाळासाहेब धंद्रे यांचे सह्यांचे अधिकार काढून घेण्यात आले. चाकण येथील बैल बाजारातील काँक्रीटीकरण कामाच्या टेंडर प्रोसेसमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सर्व संचालकांनी केला आहे. मात्र भ्रष्टाचाराचे आरोप सभापतींनी फेटाळले आहेत. कामकाजातील तांत्रिक बाबीमुळे काही झाले असल्यास पाहू असे सभापती म्हणाले.

यावेळी संचालक विलास कातोरे, चंद्रकांत इंगवले, बाळशेठ ठाकूर, धैर्यशील पानसरे, नवनाथ होले, विठ्ठल वनघरे, अशोक राक्षे, शांताराम भोसले, अनिल बाबा राक्षे, बाबाजी काळे, राम गोरे, पांडुरंग बनकर, सयाजी मोहिते, सुगंधाताई शिंदे, सुरेखा टोपे, रेवणनाथ थिगळे हे १६ संचालक उपस्थित होते. माजी सभापती व विद्यमान संचालक चंद्रकांतदादा इंगवले यांना तात्पुरते सह्यांचे अधिकार देण्यात आले आहेत.

 

         यासंदर्भात सभापती विनायक घुमटकर म्हणाले की, “कामकाज करताना तांत्रिक मुद्द्यावर काही बाबी झाल्या असतील, त्यावर मार्ग काढू व पुढे पाहू.” भ्रष्टाचाराचे आरोप सभापतींनी फेटाळले आहेत.

 

 

प्रभारी सचिव बाळासाहेब धंद्रे म्हणाले की, “संचालकांना विश्वासात न घेतल्यामुळे सह्यांचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत.”

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

2 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

6 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.