मराठा सेवा संघ व इतर कक्षाच्या पदाधिका-यांची निवड

महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
इंदापूर : मराठा सेवा संघ व इतर कक्षाच्या तालुका स्तरावरील पदाधिका-यांची नुकतीच निवड करण्यात आली. युवा कार्यकर्ते राहुल गुंडेकर यांच्यावर मराठा सेवा संघाच्या इंदापूर शहराध्यक्षपदी जबाबदारी सोपवण्यात आली.
या निवडीसाठी प्रा. डॉ. जयश्री गटकुळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुकृपा भवन येथे विशेष बैठक घेण्यात आली.
निवडण्यात आलेल्या इतर पदाधिका-यांची नावे अशी :
जिजाऊ ब्रिगेड शहराध्यक्ष – पुजा शिंदे, नामदेव-तुकाराम वारकरी परिषद तालुकाध्यक्ष – नवनाथ माने
या पदाधिकाऱ्यांना मराठा सेवा संघाचे इंदापूर तालुकाध्यक्ष राहुल घोगरे यांच्या हस्ते निवडीची पत्रे देण्यात आली.
“शहरात होणा-या प्रत्येक सामाजिक कार्यात मराठा सेवा संघ अग्रेसर असेल. समाजाच्या प्रगतीसाठी प्रामाणिक काम करेल”, असे प्रतिपादन नवनिर्वाचित शहराध्यक्ष राहुल गुंडेकर यांनी केले. इतर पदाधिका-यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.
admin

Recent Posts

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

3 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

4 weeks ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

4 weeks ago

MahaBulletin — 07 May 2026

बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…

1 month ago

MahaBulletin — 06 May 2026

मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…

1 month ago

This website uses cookies.