अध्यात्मिक

आई-वडिलांच्या स्मरणार्थ भंडारा डोंगरावरील जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे मंदिरासाठी १ लाखांचा धनादेश, खराबवाडीचे माजी उपसरपंच काळुराम केसवड व परिवाराकडून मंदिरासाठी देणगी प्रदान

आईवडिलांच्या स्मरणार्थ भंडारा डोंगरावरील जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे मंदिरासाठी लाखांचा धनादेश,
खराबवाडीचे माजी उपसरपंच काळुराम केसवड परिवाराकडून मंदिरासाठी देणगी प्रदान

महाबुलेटीन न्यूज

चाकण : खराबवाडी गावचे माजी उपसरपंच, उद्योजक काळुराम केसवड यांनी वडील कै. तुकाराम पांडु केसवड आई कै. गं. भा. गऊबाई तुकाराम केसवड यांचे स्मरणार्थ एक लाख रुपयांचा धनादेश जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिरासाठी वडिलांच्या पुण्यस्मरणदिनी हभप. पंकजमहाराज गावडे यांचेकडे सुपूर्द केला.

या प्रसंगी माजी उपसरपंच, उद्योजक प्रकाशभाऊ खराबी, भैरवनाथ सोसायटीचे माजी चेअरमन कांताराम कड, अनंतकृपा पतसंस्थेचे माजी चेअरमन सोपानराव खराबी, हनुमान दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष साहेबराव कड, सचिव बाळासाहेब खराबी, संचालक मधुकर कड, नंदाराम खराबी, हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाचे अध्यक्ष हनुमंत देवकर, उद्योजक विक्रम केसवड, अर्जुन केसवड, हर्षवर्धन केसवड, स्वराज गव्हाणे आदी उपस्थित होते.

माघ शुद्ध दशमी दिनी हभप. गावडे महाराज यांचे किर्तन श्रवण केल्यावर काळूराम केसवड यांनी भंडारा डोंगरावरील जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे मंदिरासाठी लाखांचा मदत निधी देण्याचा केलेला संकल्प केसवड परिवाराने वडिलांच्या पुण्यस्मरण दिनी पूर्ण केला.

0000

MahaBulletin Team

Recent Posts

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

4 weeks ago

ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…

1 month ago

स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्तांकडून पालखी सोहळा पूर्वतयारीचा आढावा

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…

1 month ago

चाकण येथे कामगार महिलेवर बलात्कार, आरोपीस १२ तासात अटक

महाबुलेटीन न्यूज चाकण : चाकण जवळील मेदनकरवाडी येथील बालाजीनगरमध्ये १३ मे रोजी कामगार महिलेवर झालेल्या…

1 month ago

पहलगाम हल्ल्यानंतर कडेकोट सुरक्षेत चारधाम यात्रेला सुरुवात, केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले

महाबुलेटीन न्यूज : Kedarnath Char Dham Yatra : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षेत केदारनाथ…

2 months ago

This website uses cookies.