गुन्हेगारी

महाबुलेटीन ब्रेकिंग न्यूज : मित्राच्या मदतीने मुलीने केला जन्मदात्या आईचा खून! चंदननगर पोलीसठाण्यात गुन्हा दाखल

महाबुलेटीन न्यूज
पुणे :
वडगाव शेरी येथे राहणार्‍या एका महिलेचा तिच्या १८ वर्षांच्या मुलीनेच आपल्या मित्रांच्या सहाय्याने खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आईच्या बँक खात्यातून परस्पर पैसे काढल्यानंतर हा प्रकार आईला कळू नये म्हणून त्या मुलीने हे अघोरी कृत्य केले आहे. मंगल संजय गोखले (वय ४५, रा. राजश्री कॉलनी, वडगाव शेरी, पुणे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

योशिता संजय गोखले (वय १८, रा. राजश्री कॉलनी, वडगाव शेरी, पुणे) असे या मुलीचे नाव असून तिच्यासह विनोद शाहू गाडे (वय ४२, रा. गोवंडी, मुंबई) यांनी याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यश मिलिंद शितोळे (रा. गणेशनगर, वडगावशेरी) यांना चंदननगर पोलिसांनी खुनाच्या आरोपाखाली अटक केली आहे.

आरोपी योशिताने मित्रांच्या सहाय्याने आपली आई मंगल यांच्या बँक खात्यातून परस्पर पैसे काढले. हे आईला समजू नये म्हणून तिची मित्रांच्या सहाय्याने हत्या करण्याचा कट रचला. त्या प्रमाणे मित्र यश शितोळे घरी बोलावून तिची आई झोपलेली असतानाच त्याला हातोडीने तिच्या डोक्यात प्रहार करावयास लावले. यावेळी आई ओरडल्यास आवाज बाहेर जाऊ नये म्हणून योशिताने आपल्या आईचे तोंड स्कार्फने दाबून धरले. ती मृत झाल्याची खात्री केल्यानंतर बाथरूममध्ये घसरून पडल्याचा बनाव करून हे गंभीर गुन्ह्याचे कृत्य लपविण्याचा प्रयत्न केला. मात्र, नातेवाईकांना या प्रकरणाचा संशय आला. त्यांनी आपला संशय पोलिसांकडे व्यक्त केला. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर आरोपींनी खुनाची कबुली दिली. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत माने अधिक तपास करीत आहेत.

MahaBulletinTeam

Recent Posts

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

4 weeks ago

ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…

1 month ago

स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्तांकडून पालखी सोहळा पूर्वतयारीचा आढावा

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…

1 month ago

चाकण येथे कामगार महिलेवर बलात्कार, आरोपीस १२ तासात अटक

महाबुलेटीन न्यूज चाकण : चाकण जवळील मेदनकरवाडी येथील बालाजीनगरमध्ये १३ मे रोजी कामगार महिलेवर झालेल्या…

1 month ago

पहलगाम हल्ल्यानंतर कडेकोट सुरक्षेत चारधाम यात्रेला सुरुवात, केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले

महाबुलेटीन न्यूज : Kedarnath Char Dham Yatra : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षेत केदारनाथ…

2 months ago

This website uses cookies.