महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : येथील महात्मा फुले मार्केट यार्ड मध्ये केंद्र सरकारचे
कृषी व कामगार कायदे जनविरोधी असल्याने त्याबाबत निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच उत्तर प्रदेश सरकारने काल हाथसर येथे पीडित मृत मुलीच्या कुटुंबीयांना सांत्वन भेट देण्यासाठी जात असलेले राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्का बुक्की केली या घटनेचा निषेध करून चाकण पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात आले.
चाकण येथील निषेध आंदोलन जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप यांचे अध्यक्षेतेखाली करण्यात आले. यावेळी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस वंदनाताई सातपुते, जिल्हा उपाध्यक्ष संग्राम मोहोळ, जिल्हा सरचिटणीस महेश ढमढेरे, जिल्हा उपाध्यक्ष पृथ्वीराज पाटिल, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ दौंडकर, पंचायत समिती सदस्य अमोल पवार, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष जमीरभाई काझी, काँग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गोरे पाटील, जेष्ठ नेते भास्कर तुळवे, तालुकाध्यक्ष विजय डोळस, महिला आघाडी तालुकाध्यक्षा जयाताई मोरे, अमोल दौंडकर, चाकण शहराध्यक्ष आनंद गायकवाड, राजुभाई इनामदार, सरूबाई करंडे, सुभाषराव होले, दिपक थिगळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
आंदोलनात उपस्थित असलेल्या जिल्हा, तालुका व शहर काँग्रेस पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले. सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे जिल्हा काँग्रेस प्रवक्ते निलेश कड पाटील यांनी मानले.
रविवार, २२ मार्च २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 आहिरे…
शनिवार, २१ मार्च २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 गॅस…
शनिवार, २१ मार्च २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुणे-नाशिक…
शुक्रवार, २० मार्च २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 महिला…
गुरुवार, १९ मार्च २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 भीषण…
बुधवार, १८ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे जिल्हा परिषद…
This website uses cookies.