महाबुलेटीन न्यूज : किशोर कराळे
मुंबई, ( दि. ११ डिसेंबर ) : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने पंचायत राज्य सार्वत्रिक निवडणूक २०२१ ते २०२५ या कालावधीत संपन्न होणाऱ्या १४ हजार ६३४ ग्रामपंचायत निवडणूकीचा कार्यक्रम आणि आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे. आजपासून आचारसंहिता लागू होत असून सदर ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या कार्यक्रम जाहीर झाला असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरूंदकर यांनी दिली.
एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० दरम्यान मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दि. २३ डिसेंबरपासून ३० डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार असून ३१ डिसेंबरला छाननी होणार आहे. दि. ४ जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून त्याच दिवशी चिन्ह वाटप करण्यात येईल. १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार आहे. तर १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
राज्यातील औरंगाबाद विभागातील ४ हजार १३४ ग्रामपंचायतींचा समावेश असून पुणे विभागात २ हजार ८७०, नाशिक विभाग २ हजार ४७६, अमरावती विभाग २ हजार ४४८, नागपूर विभाग १ हजार ५०८ आणि कोकण विभागातील ७९८ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. कोकणातील ठाणे जिल्ह्यातील १५८ ग्रामपंचायती, पालघर ३, रायगड ८८, रत्नागिरी ४७९ आणि सिंधुदुर्ग ७० ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील ४३३, सांगली १५२, सातारा ८७९, सोलापूर ६५८ आणि पुणे जिल्ह्यातील ७४८ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
———
■ पुणे जिल्ह्यात ७४८ ग्रामपंचायती, तर खेड तालुक्यातील १६२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
——–
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.