महाबुलेटीन न्यूज
चाकण एमआयडीसी : गोनवडी ( ता. खेड ) येथे मंगळवारी ( दि. ८ ) झालेल्या अल्पवयीन मुलीच्या खुनातील फरार गुराखी आरोपी माऊली याने मयत मुलीच्या घरामागील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आज ( दि. ११ ) रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. माऊली याचा मृतदेह मोहिते यांच्या घरामागील झाडाला लटकताना आढळला. पोलिस अधिकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.
येथील गोनवडी मध्ये म्हशी सांभाळण्यासाठी आणलेल्या १८ वर्षीय माऊली नावाच्या मुलाने किरकोळ भांडणातून शेतकऱ्याच्या अल्पवयीन मुलीचा खून केल्याची घटना मंगळवारी घडली होती. साक्षी सचिन मोहिते ( वय १६ वर्षे ) हिचा किरकोळ भांडणातून त्याने खून करून फरार झाला होता. घटना घडल्यानंतर तीन दिवसांनी त्याने आत्महत्या केल्याने गावात उलट सुलट चर्चेला उधाण आले होते, मात्र पोलिसांनी ही आत्महत्याच असल्याचे सांगून कोणताही घातपात झाला नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांनी सांगितले.
माऊली ( पूर्ण नाव नाही, वय १८, मूळ रा. नासिक ) हा मोहिते कुटुंबात गुरे ( म्हशी ) सांभाळण्यासाठी मागील ७-८ वर्षांपासून राहात होता. किरकोळ भांडणाच्या कारणावरून माऊलीने बाळू बाबुराव मोहिते यांच्या पड जमिनीत साक्षीचा गळा कशानेतरी दाबून खून केला. या घटनेनंतर तो फरार झाला होता. माउलीने खुनाच्या पश्चातापातून आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
घटनास्थळी पोलीस उपायुक्त इप्पर मंचक, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव, पोलीस निरीक्षक प्रकाश धस, सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. के. राठोड, पोलीस उपनिरीक्षक पी.आर. कठोरे, व पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे यांनी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. के. राठोड हे करीत आहेत.
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.