महाबुलेटिन नेटवर्क। प्रतिनिधी
राजगुरूनगर : लॉकडाऊनमध्ये संपूर्ण जनता भीतीच्या आणि गोंधळाच्या अवस्थेत असताना खेड तालुक्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व बजरंग दल प्रखंडने पुढे सरसावत तात्काळ 23 मार्च या लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून पोलीस व वैद्यकीय कर्मचार्यांना अल्पोहार देण्यास सुरुवात केली.
पुढे परिस्थितीत झालेल्या बदलानुसार, “सीता रसोई” ह्या कम्युनिटी किचनच्या माध्यमातून तालुकाभरात मोठे अन्नछत्र उभारून अत्यावश्यक सेवा कर्मचारी, विस्थापित अनवाणी पायपीट करणारे नागरिक तसेच गोरगरीब गरजू व्यक्तींसाठी अन्नसेवा सुरू केली होती. त्यासोबत मास्कवाटप तसेच 2000 पेक्षा जास्त कुटुंबांना किराणा साहित्य वाटप सुरूच होते. ह्यासोबतच भीमाशंकर अभयारण्यातील मुक्या प्राण्यांसाठीही अन्नसेवा सुरूच होती.
हे सर्व कार्य याची देही याची डोळा पाहणारे समीर थिगळे ( मनसे पुणे जिल्हा अध्यक्ष ) यांनी वेळोवेळी या सेवाकार्याचे कौतुक केलेच होते. परंतु गोपाळकाल्याचा मुहूर्त साधत समिर थिगळे आपल्या मित्रपरिवारासह विश्व हिंदू परिषदेच्या वनवासी वसतीगृह कार्यालयाला भेट देत, सेवाकार्याचा सन्मान म्हणून “कोरोना योद्धा” मनसे सन्मानचिन्ह दिले.
त्यांनी नेहमीप्रमाणे सामाजिक बांधिलकी जपत त्यांची मुलगी “शांभवी” हिचा यंदाचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करून आर्थिक मदत केली. ही आर्थिक मदत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व बजरंग दल यांनी खेड तालुक्यातील दत्तक घेतलेल्या वाळद येथील “मळूदेवी माध्यमिक विद्यालय” येथे निसर्ग चक्रीवादळात शाळेच्या छताच्या झालेल्या नुकसानाची डागडुजी करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. दरम्यान एका संघटनेने दुसऱ्या संघटनेच्या कामाची दखल घेऊन केलेला गौरव कौतुकास्पद आहे.
—–
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.