सण-उत्सव

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवास परवानगी नाहीच

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवास परवानगी नाहीच
महाबुलेटिन नेटवर्क। प्रतिनिधी
पुणे: कोरोना संसर्गाचा धोका कायम आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवास परवानगी देणे शक्य नाही, असे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले आहे.
पुणे येथे कोरोना निर्मूलन आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी जिल्ह्यातील पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. सार्वजनिक गणेशोत्सव याबाबत आपली भूमिका अजित पवार यांनी मांडली. कोरोनाचा धोका संपला नाही. त्यात गणेशोत्सवास परवानगी दिल्यास पन्नास ते पंचावन्न लाख लोक या काळात रस्त्यावर येऊ शकतात. यामुळे कोरोना संसर्ग वाढू शकतो.
जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात येत असून सार्वजनिक गणेशोत्सवास परवानगी दिल्यास यास छेद बसेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरात सार्वजनिक गणेशोत्सव कार्यक्रमाना परवानगी नाही, अशी स्पष्ट भूमिका अजित पवार यांनी घेतली.
MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 26 Jul 2026

शनिवार, २५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेडमध्ये…

11 minutes ago

MahaBulletin — 23 Jul 2026

बुधवार, २२ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 💧 अतिवृष्टी…

3 days ago

MahaBulletin — 20 Jul 2026

रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…

6 days ago

MahaBulletin — 18 Jul 2026

शुक्रवार, १७ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ तीन…

1 week ago

MahaBulletin — 17 Jul 2026

बुधवार, १५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

1 week ago

MahaBulletin — 14 Jul 2026

सोमवार, १३ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 पंढरीच्या…

2 weeks ago

This website uses cookies.