अपघात

कोरोना काळात अपघातग्रस्तांना वाचवून त्यांनी दाखविली माणुसकी

 

राजवर्धन पाटील यांच्यामुळे अपघातग्रस्तांना मिळाले तातडीने उपचार

 

महाबुलेटीन न्यूज : शैलेश काटे
इंदापूर : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे पुत्र नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी समयसूचकता दाखवल्याने दोघा अपघातग्रस्तांना तातडीने उपचार करणे शक्य झाले.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, आपल्या कामानिमित्त राजवर्धन पाटील इंदापूरहून भिगवणच्या दिशेने निघाले होते. पळसदेव काळेवाडीच्या दरम्यान पुणे सोलापूर महामार्गाच्या कडेला त्यांना गर्दी दिसली. गाडी बाजुला घेवून पाटील तिकडे गेले. तेथे अज्ञात वाहनाने ठोस मारल्याने जखमी अवस्थेत पडलेले दोघे जण दिसले. त्यापैकी एक बेशुध्द पडला होता, तर दुसरा हा गंभीर जखमी झाला होता. बघ्यांपैकी कोणाची त्यांना मदत करण्याची तयारी दिसत नव्हती.

प्रसंगाचे गांभीर्य ओळखून पाटील यांनी जखमींवर तात्काळ उपचार व्हावेत याकरिता वेळ न दवडता, त्या दोघांना आपल्या वाहनात बसवून थेट भिगवणच्या शासकीय रूग्णालयात दाखल केले. त्यांच्या कडील मोबाईलमधून त्यांच्या नातेवाईकांचे मोबाईल नंबर काढून, त्यांना अपघाताबाबत माहिती दिली. डॉक्टरांना आवश्यक त्या सूचना दिल्यानंतर ते मार्गस्थ झाले.
——

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 04 Aug 2026

सोमवार, ३ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

51 minutes ago

MahaBulletin — 03 Aug 2026

रविवार, २ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 धरण…

1 day ago

MahaBulletin — 02 Aug 2026

शुक्रवार, ३१ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आज…

2 days ago

MahaBulletin — 31 Jul 2026

गुरुवार, ३० जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 29 Jul 2026

मंगळवार, २८ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

6 days ago

MahaBulletin — 27 Jul 2026

रविवार, २६ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 नीट…

1 week ago

This website uses cookies.