महाबुलेटीन न्यूज : शैलेश काटे
इंदापूर : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे पुत्र नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी समयसूचकता दाखवल्याने दोघा अपघातग्रस्तांना तातडीने उपचार करणे शक्य झाले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, आपल्या कामानिमित्त राजवर्धन पाटील इंदापूरहून भिगवणच्या दिशेने निघाले होते. पळसदेव काळेवाडीच्या दरम्यान पुणे सोलापूर महामार्गाच्या कडेला त्यांना गर्दी दिसली. गाडी बाजुला घेवून पाटील तिकडे गेले. तेथे अज्ञात वाहनाने ठोस मारल्याने जखमी अवस्थेत पडलेले दोघे जण दिसले. त्यापैकी एक बेशुध्द पडला होता, तर दुसरा हा गंभीर जखमी झाला होता. बघ्यांपैकी कोणाची त्यांना मदत करण्याची तयारी दिसत नव्हती.
प्रसंगाचे गांभीर्य ओळखून पाटील यांनी जखमींवर तात्काळ उपचार व्हावेत याकरिता वेळ न दवडता, त्या दोघांना आपल्या वाहनात बसवून थेट भिगवणच्या शासकीय रूग्णालयात दाखल केले. त्यांच्या कडील मोबाईलमधून त्यांच्या नातेवाईकांचे मोबाईल नंबर काढून, त्यांना अपघाताबाबत माहिती दिली. डॉक्टरांना आवश्यक त्या सूचना दिल्यानंतर ते मार्गस्थ झाले.
——
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.