महाबुलेटिन नेटवर्क / प्रतिनिधी
शिरूर : चारित्र्याचा संशय घेऊन शिरूर ( जि. पुणे ) येथे एका ३० वर्षीय महिलेचा प्रियकराने चाकूने गळा कापून खून केला असल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना काल रात्री पावणेदोनच्या सुमारास घडली. सारिका नामदेव गिरमकर ( वय ३०, मूळ रा. कुऱ्हाडवाडी, निमोणे, ता. शिरूर, जि. पुणे ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सारिकाचा प्रियकर दत्तात्रय गेनभाऊ गायकवाड ( रा. वाडा कॉलनी, ता. शिरूर, मूळ रा. शिंदोडी, ता. शिरूर, जि. पुणे ) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी कि, हे प्रेमी युगुल घरमालक फिर्यादी बबन पर्वतराव शेटे ( वय ६९, रा. वाडा कॉलनी, शिरूर ) यांच्या खोलीत जानेवारी पासून भाडेकरू म्हणून एकत्र राहत होते. सारिकाच्या चारित्र्याच्या संशयावरून त्यांची भांडणे होत होती. काल ( दि. २७ ) रात्री पावणेदोनच्या सुमारास सारिका झोपली असताना दत्तात्रय याने तिचा गळा चाकूने कापून खून करून कारेगाव येथे कंपनीत निघून गेला. त्यानंतर तो स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन या गुन्ह्याची कबुली दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी शर्मा मॅडम व पोलीस निरीक्षक खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. एन. काबुगडे हे पुढील तपास करीत आहेत.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.