व्यापार/वाणिज्य

वाहन चालकांच्या हाती स्टेअरिंगऐवजी टोपले अन् खोरे …!

लॉकडाऊन मुळे वाहनचालकांची उपासमार
महाबुलेटीन नेटवर्क / ओमप्रकाश तांबोळकर
लातुर : कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी गेल्या चार महिन्यापासून लाॅकडाऊनमुळे प्रवाशी वहातुक बंद आहे. त्यामुळे वाहनचालकावर उपासमारीची वेळ आली आहे.  हातावरचे पोट असलेल्या या चालकांना संसाराचा गाडा चालविण्यासाठी शेतात मजुरी किंवा बांधकाम मिस्ञीच्या हाताखाली मजुरी करुन दिवस घालवावे लागत आहे.
कोरोना प्रतिबंधासाठी जाहीर केलेल्या लाॅकडाऊनमुळे परवानाधारक प्रवाशी वहातुक बंद आहे. शिवाय शाळा काॅलेजही बंद आहेत. लाॅकडाऊन शिथील झाल्यामुळे अनेक व्यवसाय सुरु झाले आहेत. परंतु गेल्या चार महिन्यापासून प्रवाशी वहातुक पूर्णतः बंद असल्याने वाहन चालक व मालक आर्थिक अडचणीत आले आहेत. या वाहनचालकांच्या विविध अडचणी लक्षात घेवुन लोकप्रतिनिधीसह शासनाने लक्ष घालुन आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी मालक व वाहनचालकांनी केली आहे.
दुष्काळाचा अभिशाप शेतातील उत्पादनाची हमी नाही. मोठ्या उद्योगधंद्याअभावी रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने या भागातील बहूतांश तरुण वाहन उद्योगात राहून आप-आपल्या कुंटुंबाचा घरप्रपंच त्यावरच चालवत आहेत. बहुतांश तरूण मालवाहातुकी बरोबरच परवानाधारक प्रवाशी वहातुक व्यावसायात आहेत. लातुर जिल्ह्यातील अनेक तरूण परवाना प्रवाशी वहातुकीद्वारे दोन तीनशेच्यावर तरुण आपल्या संसाराचा घरखर्च यावर चालवितात. परंतु लाॅकडाऊनमूळे गेल्या चार महिन्यापासून हा व्यवसाय बंद असल्याने वाहनचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. काही वहानचालकांनी कुंटुंबाचा उदरनिर्वाहासाठी शेतमजुरी किंवा बांधकाम मिस्ञीच्या हाताखाली मजुरीचा मार्ग निवडला आहे.
परवाना प्रवाशी वहातुक बंद असली तरी वाहनासाठीचा टॅक्स, इन्शुरन्स कागदपञासाठी लागणारा वार्षीक ४० ते ५० हजार रूपये खर्च सुरुच आहे. या खर्चाचे ओझे डोक्यावर असताना चार महिन्यापासुन धंदा बंद आहे. हा व्यावसाय चालु होण्याची खाञी नसल्याने चालकांवर संकट कोसळले आले आहे.
“संचारबंदीमुळे प्रवाशी वहातुक पुर्णता बंद आहे. गेल्या चार महिन्यापासुन हाताला काम नाही. गाडी चालवुन महिन्याला वीस ते पंचवीस हजार रूपये मिळत होते. त्यातुन गाडीचे हप्ते व घरखर्च भागविण्यासाठी मदत मिळत होती. सध्या उत्पन्नच नसल्याने कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे” — दिनकर बानाटे ( वाहनमालक शिरूरअनंतपाळ )
admin

Share
Published by
admin

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

2 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

6 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.