महाबुलेटीन न्यूज
चाकण : अल्पवयीन मुलीला एकटे गाठून तिच्यावर जबरदस्तीने वेळोवेळी केलेल्या बलात्कारातून एक १२ वर्षाची अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली असून तिने नुकताच एका बाळाला जन्म दिला आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांनी पीडित मुलींच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून दोन जणांच्या विरोधात चाकण पोलीस स्टेशनमध्ये बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका तरुणास अटक करण्यात आली असून एकजण अद्याप फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, . हा प्रकार डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ दरम्यान चाकण येथील राक्षेवाडीमध्ये तसेच भामा नदीच्या काठी घडला होता. याप्रकरणी अक्षय पराजी खडे ( वय २०, रा. कोळवाडी, घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर त्याचा मित्र सुनिल मधे (रा. राक्षेवाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे ) अद्याप फरार आहे
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, ही अल्पवयीन १२ वर्षाची मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून अक्षय खडे व सुनिल मधे यांनी तिच्यावर जबरदस्तीने व आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी तिला वाटेत वेळोवेळी गाठून तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केला. या अत्याचारातून ती गर्भवती राहिली होती. तिने नुकताच एका बाळाला जन्म दिला. त्यानंतर तिच्या आईने मंचर पोलिसांकडे फिर्याद दिली होती. मंचर पोलिसांनी ही फिर्याद चाकण पोलिसांकडे वर्ग केली.
त्यानुसार, अक्षय पराजी खडे ( वय २०, रा. पानसरेवस्ती, ठाकरवाडी, कोळवाडी, घोडेगाव, ता. आंबेगाव, जि.पुणे ) या आरोपीच्या चाकण पोलिसांनी ताबडतोब शोध घेऊन मुसक्या आवळल्या आहेत. तो मजुरी करीत असून त्याला २३ तारखेपर्यंत पोलिस कोठडी मिळाल्याची माहिती तपास अधिकारी पूनम जाधव यांनी दिली. तर, दुसरा आरोपी सुनिल मधे (रा. राक्षेवाडी, चाकण, ता. खेड) याचा चाकण पोलीस शोध घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
००००
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.