अपघात

चाकण-तळेगाव रस्त्यावर खड्डा चुकवताना दोन कंटेनरची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात; एका वाहन चालकाचा मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी…. ● चाकण-तळेगाव महामार्गावर 20 किमी 8 तास वाहतूक कोंडी

चाकण-तळेगाव रस्त्यावर खड्डा चुकवताना दोन कंटेनरची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात; एका वाहन चालकाचा मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी….
● चाकण-तळेगाव महामार्गावर 20 किमी 8 तास वाहतूक कोंडी

महाबुलेटीन न्यूज । प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे : चाकण-तळेगाव राष्ट्रीय महामार्गावर खड्डा चुकवताना दोन कंटेनरची समोरासमोर धडक झाली. या अघातात एका वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा चालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शुक्रवारी (दि. 17) रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास इंदोरी ( ता. मावळ ) येथील तोलानी इन्स्टिट्यूटच्या गेट समोर झाला. या अपघातानंतर चाकण-तळेगाव-शिक्रापूर रस्त्यावर तब्बल 8 तास वाहतूक कोंडी झाली होती.

विकास (पूर्ण नाव नाही, वय 35, रा. बिहार) असे मृत कंटेनर चालकाचे नाव आहे. उद्धव पोपट नाकाडे (वय 40, रा. ढोर जळगाव, ता. शेगाव, जि. अहमदनगर) गंभीर जखमी झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे.

पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव-चाकण राष्ट्रीय महामार्गावरील मोठ्या आकाराचा खड्डा चुकविताना चाकण बाजूला जाणारा (कंटेनर क्रमांक एमएच 46 एच 3710) चालक विकास (पूर्ण नाव, पत्ता माहित नाही) यांचा कंटेनर समोरून मुंबई बाजूला जाणाऱ्या (कंटेनर क्रमांक एमएच 40 बीएल 9071) चालक उद्धव नाकाडे यांच्या कंटेनरला समोरासमोर धडकला. यात विकास याला गंभीर जखमा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर उद्धव नाकाडे हा गंभीर जखमी झाला.

खड्यामुळे जातोय जीव :-
तळेगाव दाभाडे-चाकण राष्ट्रीय महामार्गाच्या मोठया आकाराच्या खड्ड्यांमुळे अपघात होऊन जीवित हानी होत आहे. आणखी किती व्यक्तींच्या बळीची प्रतीक्षा आहे, असा सवाल नागरिकांनी व्यक्त केला. अपघातानंतर शनिवारी सकाळी 10 वाजेपर्यंत वडगाव मावळ ते बहुळ पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. आतातरी प्रशासन खड्डे बुजविणार का? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता वैशाली भुजबळ यांनी बुधवारी (दि. 16) सांगितले होते की, हे खड्डे ठेकेदार दुरुस्त करणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच खड्डे दुरुस्त केले असते तर अपघात टळला असता.
००००

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

11 hours ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

2 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

5 days ago

MahaBulletin — 29 Aug 2026

शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 28 Aug 2026

बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…

1 week ago

This website uses cookies.