महाबुलेटिन नेटवर्क / संतोष म्हस्के
भोर : शहरातील नागोबा आळी येथे नागराज तरुण मंडळ व भोर ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षी नागपंचमीचा सण मोठ्या उत्सहात साजरा केला जातो. या उत्सवासाठी तालुक्यातून हजारो नागरिक उपस्थित राहत असतात. मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने नागपंचमी उत्सव रद्द केल्याने दोनशे वर्षांनंतर नागरिकांचे नागोबाचे दर्शन हुकले आहे.
भोर तालुक्यात अनेक गावे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंटेन्मेंट व बफर झोन म्हणून करण्यात आली आहेत. यामुळे पारंपरिक सार्वजनिक सणांवर शासनाने बंदी आणली आहे. त्यामुळे भोर येथील नागोबा आळीतील थाटामाठात साजरा होणारा नागपंचमी उत्सव यावर्षी होऊ शकला नाही. दरवर्षी या उत्सवात मंडळाचे कार्यकर्ते वारुळाची माती आणून सहा फूट उंच श्रीयाल शेठ यांची आकर्षक मूर्ती तयार करतात. या मूर्तीच्या दर्शनासाठी तालुक्यातून भाविक गर्दी करीत असतात. तसेच महिला पारंपरिक खेळ खेळतात. या ठिकाणी दरवर्षी भाविक गर्दी करीत असल्याने तसेच लहान मुलांची खेळनी व खाद्यपदार्थांची दुकाने थाटत असल्याने या ठिकाणाला यात्रेचे स्वरूप येते.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.