महाबुलेटिन नेटवर्क / संतोष म्हस्के
भोर : भोरच्या पश्चिमेकडील म्हसर खुर्द ( ता.भोर ) येथील नम्रता मारुती सातपुते ( वय-१९ ) या मुलीच्या आत्महत्ये प्रकरणी गावातील एका युवकास भोर पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नम्रता सातपुते हिने ( दि. २३ ) रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची फिर्याद वडील मारुती दादू सातपुते यांनी दिली होती. मात्र गुरुवार ( दि. २५ ) मुलीचे वडील मारुती दादू सातपुते यांनी पुन्हा भोर पोलिस ठाण्यात माझ्या मुलीने गावातील एका तरुणाच्या एकतर्फी प्रेमाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे निवेदन दिले. यानंतर पोलिसांच्या तपासाअंती भरत गणपत कंक या तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त करणे व अनुसूचित जाती-जमाती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. भोर उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव हे पुढील तपास करीत आहेत.
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…
शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…
शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…
मंगळवार, १४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…
This website uses cookies.