महाबुलेटिन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात सर्वात मोठ्या असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी खासदार शरद पवार, तर उपाध्यक्षपदी आमदार चेतन तुपे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी निवड झाली आहे.
सातारा येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ह्या निवडी करण्यात आल्या. हि निवड सन २०२०-२१ ते २०२२-२३ या तीन वर्षाकरिता करण्यात आली आहे. आमदार तुपे हे रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागात मागील १२ वर्षांपासून कार्यरत असून गेल्या १० वर्षांपासून जनरल बॉडीचे सदस्य आहेत. तसेच गेल्या १२ वर्षांपासून ते हडपसर येथील साधना शैक्षणिक संकुलातील व्यवस्थापन समितीचे प्रमुख व साने गुरुजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. विशेष म्हणजे त्यांचे वडील माजी खासदार स्वर्गीय विठ्ठल तुपे यांनी देखील संस्थेचे उपाध्यक्षपद भूषविले होते. कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निवडीबद्दल आंबेगाव तालुक्यासह उत्तर पुणे जिल्ह्यातील व चेतन तुपे यांच्या निवडीबद्दल हडपसर विधानसभा मतदार संघातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे. खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवडीमुळे संस्थेला पुन्हा एकदा बळकटी मिळणार आहे.
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.