कृषी

भीमाशंकर साखर कारखान्यामध्ये मिल रोलरचे पूजन

महाबुलेटीन नेटवर्क / अविनाश घोलप
घोडेगाव : दत्तात्रयनगर, पारगाव ( ता. आंबेगाव ) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगाम २०२०-२१ च्या पूर्वतयारी अंतर्गत मशिनरी ओव्हर ऑयलिंग करुन जोडणीचे कामास मिल रोलर पूजन कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांच्या शुभहस्ते करुन सुरुवात करण्यात आली. सोशल डिस्टंसिंगचा नियम पाळून नव्या हंगामाच्या तयारीसाठी केलेला पहिलाच कार्यक्रम संपन्न झाला.
 कारखान्याच्या सन २०२०-२१ गळीत हंगामाची तयारी सुरु झाली आहे. कारखान्याचा गाळप हंगामाचा आढाव्याबाबत माहिती देताना कारखान्याचे चेअरमन श्री. बेंडे म्हणाले की, येत्या गळीत हंगामाकरीता एकूण ८ लाख मे. टन गाळप करण्याचे संचालक मंडळाचे उद्दिष्ट्य असून त्या दृष्टिने ऊस तोडणी वाहतुक करणेकामी ४०० टायरबैलगाडी,  २०० ट्रॅक्टर टायरगाडी व २५० टोळीसह ट्रक / ट्रॅक्टरचे करार पुर्ण झालेले आहेत. याशिवाय नविन ऊस तोडणी यंत्र खरेदी करणाऱ्या कंत्राटदारांसाठी कारखान्याचे संस्थापक, संचालक तसेच महाराष्ट्र राज्याचे कामगार व राज्य उत्पादनशुल्क मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आकर्षक योजना संचालक मंडळाने जाहीर केली आहे. कंत्राटदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असून १५ ऊस तोडणी यंत्र कंत्राटदारांशी करार झाले आहेत. कारखान्यातील मशिनरी ओव्हरऑयलिंग, रिपेअरींग कामे सुरु असून सदरची कामे दर्जेदार व वेळेत पुर्ण करुन ऑक्टोबर महिन्यात प्लॅन्ट गाळपासाठी सज्ज राहण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. हा गाळप हंगाम मोठा असल्याने ऊस तोडणी वाहतुक कंत्राटदार, तोडणी मजुर, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हंगाम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य करावे. सभासदांनीही आपला ऊस आपल्याच कारखान्यास गळीतास द्यावा, असे आवाहन श्री. बेंडे यांनी केले आहे.
 मिल रोलर पूजन समारंभास कारखान्याचे व्हाईस चेअरमन ज्ञानेश्वर गावडे, संचालक अशोक घुले, बाबासाहेब खालकर, ज्ञानेश्वर अस्वारे, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, टेक्निकल मॅनेजर शिरीष सुर्वे, प्रोसेस मॅनेजर किशोर तिजारे, सचिव रामनाथ हिंगे, मुख्य लेखापाल राजेश वाकचौरे, मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे, सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे आदी उपस्थित होते.
admin

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.