चाकण:अत्यंत प्रतीक्षेनंतर अयोध्ये मध्ये भव्य राम मंदिर साकारले जाणार आहे. या राम मंदिराच्या पायाभरणी चा कार्यक्रम उद्या अयोध्या मध्ये मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारचा संभ्रम निर्माण होऊ नये याची प्रशासन पूर्णपणे खबरदारी घेत आहे.
आपल्या परिसरातील ताज्या बातम्या जलद वाचण्यासाठी आजच साईट वर बेल 🔔 दाबून सबस्क्राईब करा
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणारे मेसेज सोशल मीडियद्वारे पसरणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. कोणत्याही डिजिटल माध्यमांमधून खोट्या बातम्या अथवा मेसेज पाठवल्यास कलम ६८ द्वारे गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यामुळे सोशल मीडिया वापरताना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे यांनी नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे व कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.