शैक्षणिक

तृप्ती सुकाळे, गणित या विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून ९५.४० टक्के गुणांसह दहावीत प्रथम

महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
कडुस : ( ता.खेड ) येथिल डायनॅमिक इंग्लिश मिडीयम स्कूलचा दहावीचा निकाल १००% लावून शाळेने उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. तृप्ती दिलीप सुकाळे या विद्यार्थिनीने ९५.४० टक्के मार्क्स मिळवून गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून स्कूल मध्ये प्रथम आली.
संपूर्ण खेड तालुक्याचे लक्ष लागलेल्या डायनॅमिक शाळेची या वर्षीची इंग्रजी माध्यमाची पहिलीच बॅच होती. स्कूल मधील  सर्व विद्यार्थी विशेष घवघवित प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाले. तसेच तृप्ती सुकाळे या विद्यार्थीनीने  गणित या विषयामध्ये १०० पैकी १०० गुण मिळवून प्रथम आली आहे.
दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले पहिल्या पाच क्रमांकाचे गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे :-
प्रथम क्रमांक : तृप्ती दिलीप सुकाळे – ९५.४० टक्के
द्वितीय क्रमांक : अस्मिती मारुती जाधव – ९२.८० टक्के
तृतीय क्रमांक : सोनल तुकाराम कावडे – ९१.६० टक्के
चतुर्थ क्रमांक : श्रुती अविनाश गोपाळे  ८९.२० टक्के
पाचवा क्रमांक : काजल अशोक शेळके व गौरी संतोष शिंदे ८६.८० टक्के
सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रताप गारगोटे, सचिव पंडित मोढवे, व्यवस्थापिका जयश्री गारगोटे, प्राचार्य निखिल ढमाले, विलास गारगोटे, कैलास शेळके, दिलीप सुकाळे, मारुती जाधव, शिवाजी गूंजाळ, रवीना गायकवाड़, सर्व संचालक, पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन करून कौतुक केले.
admin

Recent Posts

MahaBulletin — 20 Jul 2026

रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…

2 days ago

MahaBulletin — 18 Jul 2026

शुक्रवार, १७ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ तीन…

4 days ago

MahaBulletin — 17 Jul 2026

बुधवार, १५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

5 days ago

MahaBulletin — 14 Jul 2026

सोमवार, १३ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 पंढरीच्या…

1 week ago

MahaBulletin — 13 Jul 2026

शनिवार, ११ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 मोशी…

1 week ago

MahaBulletin — 10 Jul 2026

गुरुवार, ९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 अतिवृष्टीमुळे…

2 weeks ago

This website uses cookies.