महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
मंचर : महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागा अंतर्गत असलेल्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र (TSS) यांनी प्रस्ताव मागविले होते. त्यामध्ये घोडेगाव प्रकल्पातील फुलवडे ता. आंबेगाव येथील अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील शिक्षक अविनाश घोलप यांचा कर्तृत्ववान व उपक्रमशील शिक्षक म्हणून सेवासन्मान करण्यात आला.
नामांकनासाठी आश्रमशाळा कर्तृत्ववान मुख्याध्यापक, उपक्रमशील शिक्षक, क्रीडा शिक्षक, तंत्रस्नेही शिक्षक, अधिक्षक/अधिक्षिका व सर्व शिक्षकेतर कर्मचारी असे गट तयार करण्यात आले होते. त्यानुसार गटाप्रमाणे प्रस्ताव
https://forms.gle/NhiTZwLU3TdGuTx29 या लिंकवर आपले नाव शाळा व कार्याचा माहिती छायाचित्रांसह PDF स्वरूपात सादर करण्यात आली होती.
त्यानुसार घोडेगाव, नाशिक, दिंडोरी, धुळे, कळवण, यावल, किनवड, पुसद, पांढरकवडा, औरंगाबाद, कळमनुरी, राजूर, जव्हार, शहापूर, पेण, डहाणू, देवरी, तळोदा व गडचिरोली या प्रकल्पातील आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांनी प्रस्ताव सादर केले होते. प्राप्त आवेदनांचे तज्ञ परीक्षकांच्या निरीक्षणातून मूल्यांकन करण्यात आले. त्यातील पात्र ७२ सदस्यांना दि. ५ सप्टेंबर २०२० रोजी तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र तर्फे विविध समाज माध्यमावर ऑनलाईन डिजिटल प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
या आश्रमशाळा कर्मचारी सेवासन्मान सोहळ्याचे आयोजन तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र परिवारातील श्री. नितीन केवटे, श्री. पंकजराज जगताप, श्री. निलेश कासार, श्री. विशाल चंदनखेडे यांनी केले होते.
—
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.