महाबुलेटीन न्यूज : हनुमंत देवकर
चाकण ( पुणे ) : सारा सिटीने स्वखर्चाने काँक्रीटीकरण करून सर्वांसाठी रस्ता खुला केला आहे. त्यामुळे एमआयडीसीत व पिंपरी चिंचवड कडे शॉर्ट कटने जाणारा पर्यायी मार्ग खुला झाल्याने कामगार वर्ग, विद्यार्थी-पालक व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. खराबवाडी ग्रामस्थांनी याबद्दल सारा सिटी प्रशासनाचे आभार मानले आहेत.
१८ फूट रुंद व २५० मीटर लांबीचा हा रस्ता पक्क्या स्वरूपाचा करण्यात आला आहे. हा रस्ता मागील वर्षापासून वाहतुकीस बंद होता. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. या गैरसोयीची दखल घेऊन सारा सिटीचे संचालक सीतारामशेठ अग्रवाल, रुपेशशेठ अग्रवाल व निलेशशेठ अग्रवाल यांनी हा रस्ता सिमेंट काँक्रीट करण्याचा निर्णय घेऊन तो आज अखेर पूर्णही केला. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून उद्योगपती रुपेशशेठ अग्रवाल व निलेशशेठ अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत सारा सिटीचे ग्राहक सत्यम सिंग व परिवार यांच्या हस्ते आज या रस्त्याचे उदघाटन करून सदर रस्ता सर्वांसाठी खुला करण्यात आला.
यावेळी पोलीस पाटील किरण किरते, सचिन लोंढे, रश्मी, तिवारी, राहुल फिरके आदी मान्यवर उपस्थित होते.
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.