सण-उत्सव

गौरी गणपती सजावट स्पर्धेत प्रिया कुर्‍हाडे प्रथम

 

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
आळंदी : शहरातील गणेशोत्सवावर जरी कोरोनाचे संकट असले तरीही महीलांच्या कला गुणांना वाव मिळावा, यासाठी आळंदी शहर भारतीय जनता पक्षाच्यावतीने ‘गौरी गणपती सजावट स्पर्धा’ आयोजित करण्यात आलेल्या होत्या. या स्पर्धेचा निकाल आज जाहीर करुन विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. भाजप शहराध्यक्ष किरण येळवंडे यांच्या प्रयत्नातुन हा उपक्रम राबविण्यात आला.

सदर घेण्यात आलेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक – प्रिया कुर्‍हाडे, द्वितीय क्रमांक – मोक्षदा पोफळे, तृतीय क्रमांक – मनिषा सुडे यांनी मिळवला आहे, तर उतेजनार्थ खुशी बोरुंदिया यांना गौरविण्यात आले. स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले.

यावेळी भाजप महीला मोर्चा तालुकाध्यक्ष अॅड.मालिनी शिंदे, शहराध्यक्ष किरण येळवंडे, अॅड.प्रितम शिंदे, संदेश जाधव, सचिन काळे, युवा मोर्चाचे अध्यक्ष आकाश जोशी, ओबीसी आघाडीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बनसोडे, सदाशिव साखरे, संतोष हजारे, गणेश उंबरे, सचिन सोळंकर, पत्रकार अर्जुन मेदनकर , दिनेश कुऱ्हाडे उपस्थित होते.

गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांबरोबरच घरोघरी घरगुती गौरी-गणेशाचीही सुंदर आरास आळंदीत केली जाते. घरोघरी छोटे खानी देखावे साकारले जातात. अशा देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देखील यावेळी देण्यात आला. या घरगुती देखाव्यांना प्रसिध्दी मिळावी, त्याचे कौतुक व्हावे तसेच घरगुती गौरी-गणेश सजावटीसाठीच्या कौशल्य, कला, गुणांना अधिकाधिक वाव मिळावा, यासाठी भाजपतर्फे या घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यास मोठा प्रतिसाद मिळाल्याचे शहराध्यक्ष किरण येळवंडे यांनी सांगितले.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 23 Oct 2026

गुरुवार, २२ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 दिवेआगर…

24 hours ago

MahaBulletin — 22 Oct 2026

बुधवार, २१ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजगुरुनगरमध्ये…

2 days ago

MahaBulletin — 20 Oct 2026

सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 अन्नपदार्थ…

4 days ago

MahaBulletin — 19 Oct 2026

रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेडमध्ये…

5 days ago

MahaBulletin — 18 Oct 2026

गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेड…

6 days ago

MahaBulletin — 13 Oct 2026

सोमवार, १२ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दिल्लीत…

2 weeks ago

This website uses cookies.