अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी
महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
घोडेगाव : अण्णाभाऊ साठे हे जाती अंताचे व क्रांतीचे रसायन आहे. त्यांच्या साहित्यातून लढण्याची प्रेरणा मिळत असून अण्णांभाऊ हे जागतिक कीर्तीचे लेखक, त्यांचे साहित्य समजून घेतले तर भारतात समानतेच्या क्रांतीची पहाट उगवेल. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी युगप्रवर्तक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतमराव खरात यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय व युगप्रवर्तक प्रतिष्ठान आंबेगाव व अनुजाती व नवबौद्ध मुलांची निवासी शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णांभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी ११ वा. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवासी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती विमल खाडे उपस्थित होत्या.
याप्रसंगी एक सामाजिक उपक्रम म्हणून १०० व्या जयंती निमित्त १०० फळ झाडांचे वृक्षारोपण मंचर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा कृष्णदेव खराडे साहेब, युगप्रवर्तक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतमराव खरात यांच्या शुभहस्ते आंबा, पपई, पेरू, चिंच, लिंबू, जांभळं, अंजीर अशा प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी शिवव्याख्याते सचिन भोजने, जितेंद्र खोसे, अरविंद साठे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. तसेच युगप्रवर्तक प्रतिष्ठानचे अध्यक्ष खरात यांनी अण्णांभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी भारत सरकारकडे केली असल्याचे सांगितले.
याप्रसंगी युगप्रवर्तक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतमराव खरात, शिवव्याख्याते सचिन भोजने, जिल्हा राष्ट्रवादी युवकांचे उपाध्यक्ष नवीन सोनवणे, दलित स्वयं संघ आंबेगाव तालुका अध्यक्ष संतोष राजगुरू, अण्णांभाऊ साठे यांच्या परिवारातील अरविंद साठे, परिवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष दयानंद मोरे, मानवी हक्क आयोगाचे आनंदराव वायदंडे सामाजिक कार्यकर्ते यशवंत काळोखे, जितेंद्र खोसे सर यांनी प्रास्तविक केले तर जाधव सर यांनी आभार मानले.
यावेळी कोरोना विषाणूबाबत दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले होते.