कोरोना

आळंदी ग्रामीण रुग्णालयाला खासदार अमोल कोल्हे यांची भेट

महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
आळंदी : शहरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव होत असून तेथील आरोग्य संदर्भात काय उपाययोजना केल्या जात आहेत, हे पाहण्यासाठी शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आळंदी ग्रामीण रुग्णालयात आज अचानक भेट दिली. यावेळी तेथील परिस्थितीची माहिती घेण्यात आली. यावेळी आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉ. जी. जी. जाधव यांनी खासदार कोल्हे यांना सविस्तर माहिती दिली. यावेळी माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, डी. डी. भोसले, सचिन घुंडरे, संदीप नाईकरे, नंदकुमार वडगावकर, प्रसाद बोराटे, पुष्पाताई कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, सागर रानवडे, योगिराज सातपुते, धनंजय घुंडरे उपस्थित होते.
आळंदी युवा विकास मंचच्या वतीने संदीप नाइकरे आणि प्रसाद बोराटे यांनी रुग्णालयात आलेल्या रुगणांची रक्ततपासणी व्हावी, त्यामुळे रुग्णाला कोणते आजार झाले हे समजेल. डासांमुळे होणारे रोग डेंगू, चिकन गुणिया इ. सर्पदंश, कुत्रे चावणे यावरील लस रुग्णालयात असाव्यात, सुसज्ज अशी रुग्णवाहिका रुग्णालयाला देण्यात याव्यात, अश्या विविध मागण्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना करण्यात आल्या.
खासदार कोल्हे म्हणाले की, ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रिया व्हायला हव्यात. यासाठी सुसज्ज यंत्र सामुग्री आहे त्याचा वापर करावा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आळंदीतील नागरिकांची व समस्येची चर्चा झाली. त्यावर उपाय योजना आखण्यात याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
admin

Recent Posts

MahaBulletin — 14 Apr 2026

मंगळवार, १४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

6 hours ago

MahaBulletin — 13 Apr 2026

रविवार, १२ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 भीमाशंकर…

2 days ago

MahaBulletin — 12 Apr 2026

शनिवार, ११ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 भेसळयुक्त…

2 days ago

MahaBulletin — 12 Apr 2026

शनिवार, ११ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 मँगो…

3 days ago

MahaBulletin — 11 Apr 2026

शुक्रवार, १० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 बालकाची…

4 days ago

MahaBulletin — 10 Apr 2026

गुरुवार, ९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दिलीप…

5 days ago

This website uses cookies.