कोरोना

आंबेगाव तालुक्यात दोन दिवसात आढळले ३७ कोरोना बाधित रुग्ण

महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
घोडेगाव : आंबेगाव तालुक्यात शुक्रवारी मंचर येथे १५ रुग्ण व शनिवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार २२ रुग्ण असे मिळून दोन दिवसात ३७ रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर आज ३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शनिवारी नव्याने आढळून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये अवसरी खुर्द २, निरगुडसर १, पोंदेवाडी २, पारगाव तर्फे अवसरी ४, घोडेगाव ३, मंचर ३, लांडेवाडी १, रांजणी १, कळंब ३, गिरवली १, पाटण १ अशा २२ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या एकूण २४७ झाली असून त्यातील १०४ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. ४ कोरोना बधितांचा मृत्यू झालेला असून १३९ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी दिली.
दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्ण संख्येत कमालीची वाढ होत असल्यामुळे १०४ गावांतील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. आजपर्यंत तालुक्यातील ३४ गावांमध्ये कोरोनाने प्रवेश केला आहे. प्रथम स्थानी मंचरमध्ये सर्वाधिक ७५ रुग्ण, दुसऱ्या स्थानी महाळुंगे पडवळ तर तिसऱ्या स्थानी घोडेगाव येथे जास्त रुग्ण आढळले आहेत. जास्त लोकसंख्या असणाऱ्या गावात संसर्ग जास्त झपाट्याने वाढताना दिसत आहे. तालुक्यातील आदिवासी पश्चिम दुर्गम भागातील पाटण, फुलवडे या गावांमध्ये देखील कोरोना पोहोचला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून प्रशासनच्या वतीने खबरदारीच्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. गावांमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे. विनाकारण घराबाहेर न पडता घरातच राहून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. मास्क व सॅनिटायझरचा वापर नित्यनियमाने करावा. हात वेळोवेळी साबणाने स्वच्छ धुवावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
admin

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

3 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

7 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.